16GB RAM आणि 32MP Selfie कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो OPPO A98 5G फोन; माहिती लीक

Highlights

  • या फोनमध्ये Snapdragon 695 मिळू शकतो.
  • हा 8GB Extended RAM सह येऊ शकतो.
  • OPPO A98 5G फोन या महिन्यात लाँच होऊ शकतो.

ओप्पो कंपनी आपल्या ‘ए’ सीरीजच्या नवीन 5जी फोनवर काम करत आहे जो काही दिवसांपूर्वी OPPO A98 5G नावानं विविध सर्टिफिकेशन्स साइट्सवर दिसला आहे. आता कंपनीनं घोषणेपुर्वी या मोबाइल फोनचे फोटोज आणि फुल स्पेसिफिकेशन्स इंटरनेटवर लीक झाले आहेत. माय स्मार्ट प्राइसनं फोन डिटेल्स शेयर केले आहेत, जे तुम्ही पुढे वाचू शकता.

ओप्पो ए98 5जी चे स्पेसिफिकेशन्स संभाव्य

  • 6.72″ FHD+ Display
  • 120Hz Refresh Rate

OPPO A98 5G संबंधित लीकमध्ये समोर आलं आहे की हा मोबाइल फोन 6.72 इंचाच्या मोठ्या स्क्रीनसह लाँच केला जाईल. हा डिस्प्ले पंच-होल स्टाईल असेल जो एलसीडी पॅनलवर बनला असेल. तसेच ओप्पो ए98 5जी फोनमध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेट मिळू शकतो. हे देखील वाचा: Google नं बनवला फोल्डेबल फोन! 10 मेला लाँच होईल Pixel Fold, पाहा डिजाईन

  • 8GB Extended RAM
  • Qualcomm Snapdragon 695

लीकमध्ये खुलासा झाला आहे की हा ओप्पो मोबाइल अँड्रॉइड 13 आधारित कलरओएसवर लाँच होईल ज्यात प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाईल. ओप्पो ए98 5जी मध्ये 8जीबी एक्सपांडेबल रॅम देखील मिळेल जो इंटरनल 8जीबी रॅमसह मिळून फोनला 16जीबी रॅमची ताकद देईल.

  • 64MP Rear Camera
  • 32MP Selfie Camera

फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा असल्याचं लीकमध्ये समोर आलं आहे. या सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर असेल जोडीला 2 मेगापिक्सलच्या इतर दोन लेन्स मिळू शकतात. लीकनुसार हा 40एक्स मायक्रोलेन्ससह येऊ शकतो. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

  • 67W SUPERVOOC
  • 5,000mAh Battery

OPPO A98 5G फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी ओप्पो ए98 5जी फोन 67वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकतो. हे देखील वाचा: अ‍ॅमेझॉन ग्रेट समर सेल 2023 : बेस्ट लॅपटॉप डील्स

ओप्पो ए98 5जी फोन कधी लाँच होईल

OPPO A98 5G चे स्पेसिफिकेशन्स लीकच्या माध्यमातून समोर आले आहेत परंतु सध्या फोनच्या लाँच टाइमलाईन तसेच किंमतीची कोणतीही माहिती मिळाली नाही. फोनचं पोस्टर लीक झाल्यामुळे आशा आहे की या महिन्यात म्हणजे मे मध्ये ओप्पो कंपनी आपल्या या 5जी मोबाइलबद्दल घोषणा करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here