OPPO F27 5G चा लाईव्ह फोटो आला समोर, पुढच्या आठवड्यात होऊ शकतो लाँच

भारतात F27 सीरीजचा प्रो+ मोबाईल जूनमध्ये लाँच झाला होता. तसेच, आता OPPO F27 5G सादर होण्याची शक्यता आहे. सांगण्यात आले आहे की आगामी हँडसेट पुढच्या आठवड्यात येऊ शकतो. 91 मोबाईलला स्मार्टफोनचा लाईव्ह फोटो आणि स्टोरेज ऑप्शनची माहिती मिळाली आहे. चला, पुढे एफ 27 चा लूक आणि समोर आलेली इतर लेटेस्ट माहिती सविस्तर जाणून घेऊया.

OPPO F27 5G चा लाईव्ह फोटो (लीक)

  • तुम्ही खाली फोटोमध्ये पाहू शकता की OPPO F27 5G मध्ये फ्लॅट एज आणि पंच-होल डिस्प्ले मिळू शकतो.
  • आशा आहे की स्मार्टफोनमध्ये मेटल फ्रेम सह ग्रेडिएंट कलर डिझाईन सादर केली जाऊ शकते.
  • जर आम्ही याची तुलना OPPO F27 Pro+ शी केली तर लूक खूप वेगळा आहे कारण प्लस मॉडेलमध्ये कर्व्ड डिस्प्ले आणि वेगन लेदर बॅक देण्यात आला आहे. तर दोन्ही फोनमध्ये मागे सर्कुलर कॅमेरा मॉड्यूल थोडा समान आहे.
  • कॅमेरा मॉड्यूलमध्ये ड्युअल या ट्रिपल कॅमेरा मिळणार असल्याची शक्यता आहे. लाईव्ह फोटोमध्ये LED फ्लॅश पण दिसत आहे.

OPPO F27 5G ची लाँच टाईमलाईन आणि स्टोरेज (लीक)

लीकनुसार OPPO F27 5G पुढच्या आठवड्यात भारतात लाँच होऊ शकतो. परंतु अजून लाँच तारीख स्पष्ट नाही, मात्र हा लवकर येण्याची शक्यता आहे. तसेच, स्टोरेज आणि रॅमबाबत सांगण्यात आलं आहे की F27 दोन व्हेरिएंट मध्ये येऊ शकतो. ज्यात 8GB रॅम + 128GB स्टोरज आणि 8GB रॅम + 256GB मेमरी मिळू शकते.

OPPO F27 Pro+ 5G चे स्पेसिफिकेशन

OPPO F27 Pro+ 5G ला जूनमध्ये लाँच केले होते ज्याची माहिती पुढे देण्यात आली आहे.

  • डिस्प्ले: OPPO F27 Pro+ 5G मध्ये 6.7 इंचाचा मोठा 3D कर्व अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. यावर 120Hz रिफ्रेश रेट आणि 2412 x 1080 पिक्सल रिजॉल्यूशनला सपोर्ट मिळतो.
  • चिपसेट: फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 7050 चिपसेट देण्यात आली आहे.
  • स्टोरेज आणि रॅम: डिव्हाईससाठी 8GB रॅम +128 जीबी स्टोरेज आणि 8GB रॅम + 256 जीबी स्टोरेज सारखे दोन मॉडेल येतात.
  • कॅमेरा: OPPO F27 Pro+ 5G मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 64 मेगापिक्सलचा OV64B प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा लेन्स आहे. तसेच, सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
  • बॅटरी: हा मोबाईल 5000mAh बॅटरी आणि 67 वॉट सुपरवूक चार्जिंगसह आहे.
  • इतर: OPPO F27 Pro+ 5G ला IP69 डस्ट आणि वॉटरप्रूफ रेटिंग प्राप्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here