जबरदस्त! 240KM च्या दमदार रेंजसह आली इलेक्ट्रिक स्कूटर; डिजाइन आणि फीचर्स देखील एक नंबर

इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये एंट्री करत चिनी मोटारसायकल ब्रँड Loncin नं आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर (electric scooter) सादर केली आहे. कंपनीनं या ई-स्कूटरला Real 5T असं नाव दिलं आहे. तसेच या स्कूटरची खासियत पाहता कंपनीचा दावा आहे की ही 2 तासांत 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. तसेच एकदा फुल चार्ज करून ही 240KM पर्यंत चालवता येते. इतकेच नव्हे तर यात रायडरला 115 km/h चा टॉप स्पीड देखील मिळतो. चला जाणून घेऊया या Real 5T Electric Scooter ची प्राइस, फीचर्स आणि डिजाइनची संपूर्ण माहिती.

आकर्षक डिजाइन

Real 5T ची डिजाइन पाहता कंपनीनं या ई-स्कूटरला स्पोर्टी लुक दिला आहे. यात स्प्लिट एलईडी आणि स्मोक वयजर आहे. तसेच संपूर्ण बॉडी कंपनीनं खूप शार्प कटसह बनवली आहे. त्याचबरोबर फ्रंटच्या वींडशील्डवर कंपनीचा लोगो देण्यात आला आहे. कंपनीनं हिच्या फ्रंट व्हीलवर डिस्क ब्रेक दिला आहे आणि ही ब्लॅक व सिल्व्हर थीमवर बनवण्यात आली आहे.

125cc पेट्रोल स्कूटर इतकी ताकद

Loncin नं ही ई-स्कूटर 125cc च्या पेट्रोल स्कूटर इतक्या पावरसह बाजारात आणली आहे. तसेच यात जवळपास 15bhp च्या आउटपुटसह एक सेंट्रली-माउंटेड मोटर देण्यात आली आहे, ज्यामुळे हिचा टॉप स्पीड 115 km/h इतका जातो. त्याचबरोबर यात 2.4kWh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे जी ई-स्कूटरच्या खाली ठेवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त Real 5T मध्ये 240km ची रेंज मिळते आणि ही 1.84kW चार्जरसह येते जो ई-स्कूटरला दोन तासांत 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करतो.

शानदार फीचर्स

एलईडी लाइट सह रियल 5टी मध्ये तीन राइडिंग मोड्स, ट्रॅक्शन कंट्रोल, ऑटोमॅटिक वार्निंग लाइट्स, एक चार्जिंग पोर्ट आणि रिवर्स गियर देखील मिळतो. ही टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि एक ऑफसेट रियर शॉकवर आधारित आहे, तर ब्रेकिंगसाठी यात सिंगल फ्रंट डिस्क आणि रियर ड्रम यूनिट देण्यात आलं आहे.

वर सांगितल्याप्रमाणे सध्या ही स्कूटर फक्त अंतरराष्ट्रीय बाजार सादर करण्यात आली आहे त्यामुळे हिच्या भारतीय लाँचची शक्यता कमी आहे. तसेच या भन्नाट स्कूटरच्या किंमतीची कोणतीही माहिती समोर आली नाही. तुम्ही भारतातील इतर इलेक्ट्रिक स्कूटर्स खरेदी करण्याचा विचार करू शकता ज्यात एथर 450X, Ola S1, TVS iQube, Bajaj Chetak इत्यादींचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here