Oppo Reno 12 सीरिजचा रेंडर फोटो आला समोर, पाहा काय मिळू शकते खास

ओप्पो आपल्या रेनो 11 सीरिजच्या अपग्रेडवर Oppo Reno 12 घेऊन येऊ शकतो. यानुसार सामान्य मॉडेल आणि Oppo Reno 12 Pro बाजारात येण्याची शक्यता आहे. सांगण्यात आले आहे की कंपनी या फोनला जून महिन्यामध्ये लाँच करू शकते. तसेच, सादर होण्याच्या आधी डिव्हाईसचा एक रेंडर फोटो समोर आला आहे. ज्यात डिव्हाईस रेनो 11 सीरिज पेक्षा खूप वेगळा दिसतो. चला, पुढे डिझाईनबाबत माहिती जाणून घेऊया.

Oppo Reno 12 सीरिज फोनचे रेंडर (लीक)

  • नवीन रेंडरमध्ये रेनो 12 सीरिजच्या फोनला वेव ग्रीन कलर ऑप्शनमध्ये दाखविण्यात आले आहे.
  • डिव्हाईसमध्ये पहिल्या 11 पेक्षा वेगळा वर्टिकल कॅमेरा माड्यूल पाहायला मिळतो. ज्यात ट्रिपल कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश लावली आहे.
  • Oppo Reno 12 फोनच्या उजव्या बाजूला पावर आणि वॉल्यूम बटन पाहायला मिळते. तसेच, बॅक पॅनलवर खालच्या बाजूला ओप्पोची ब्रँडिंग आहे.
  • तसेच ही डिझाईन कंपनीच्या जुन्या रेनो 6 सीरिजशी मिळते-जुळते वाटत आहे. जर असे झाले तर ब्रँड जुना पॅटर्न घेऊ येऊ शकतो.

Oppo Reno 12 सीरिजचे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

6.7 इंचाचा OLED डिस्प्ले

रेनो 12-Dimensity 8300 चिप

रेनो 12 प्रो Dimensity 9200 Plus चिप

50 मेगापिक्सल कॅमेरा

80W चार्जिंग

  • डिस्प्ले: रेनो 12 प्रो स्मार्टफोन चारही बाजूला मायक्रो वक्रतासह 6.7 इंचाच्या OLED पॅनलसह येण्याची शक्यता आहे. तर रेनो 12 आणि रेनो 12 प्रो दोन्ही फोनमध्ये 1.5K रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो.
  • प्रोसेसर: सीरिजच्या रेनो 12 मध्ये Dimensity 8300 चिप दिली जाऊ शकते. तर रेनो 12 प्रो ला Dimensity 9200 Plus प्रोसेसरसह ठेवले जाऊ शकते.
  • कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता रेनो 12 प्रो स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2x ऑप्टिकल झूमसह 50 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा दिला जाऊ शकतो.
  • चार्जिंग: रिपोर्टमध्ये समोर आले आहे की Reno 12 मध्ये 67W चार्जिंग आणि Reno 12 Pro मध्ये 80W चार्जिंग दिली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here