नोकिया पण घेऊन येत आहे ‘नॉच डिसप्ले’ वाला अजून एक फोन, नोकिया 5.1 प्लस चा वीडियो आला समोर

जवळपास 2 आठवड्यांपूर्वीच नोकिया ब्रांड अंतर्गत कंपनी चा नवीन स्मार्टफोन नोकिया 5.1 अंर्तराष्ट्रीय बाजारात लॉन्च केला गेला होता. कंपनी ने नोकिया 5.1 सोबत नोकिया 3.1 आणि नोकिया 2.1 पण सादर केले होते. तसेच आता बातमी येत आहे की नोकिया चे मालकी हक्क असणारी टेक कंपनी एचएमडी ग्लोबल नोकिया 5.1 च्या अजून एका वर्जन नोकिया 5.1 प्लस वर पण काम करत आहे जो आगामी दिवसांमध्ये बाजारात येईल.

नोकिया 5.1 प्लस बद्दल प्रसिद्ध टिप्सटर आॅनलीक्स ने एक ट्वीट शेयर केले आहे ज्यात फोन च्या रेंडर ईमेज सोबत फोन चा 360 डिग्री वीडियो दाखविण्यात आला आहे. ट्वीट मध्ये फोन चे स्पेसिफिकेशन्स तसेच याच्या लॉन्च संबंधी माहिती देण्यात आली नाही पण रेंडर ईमेंज व वीडियो वरून फोन च्या लुक व डिजाईन ची माहिती मिळाली आहे. नोकिया 5.1 प्लस मध्ये नॉच दिसत आहे. नोकिया एक्स6 नंतर हा कंपनी चा दूसरा स्मार्टफोन असेल जो बेजल लेस नॉच डिस्प्ले सह लॉन्च होईल.

नोकिया 5.1 प्लस च्या फ्रंट पॅनल वर बेजल लेस नॉच डिस्प्ले आहे. फोन च्या फ्रंट पॅनल वर खालच्या बाजूला थोडे बेजल्स आहेत त्यावर ‘नोकिया’ चा लोगो आहे. फोन च्या नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा व स्पीकर दिसत आहे. बोलले जात आहे की फोन मध्ये 5.7-इंचाचा डिस्प्ले दिला जाईल. त्याचबरोबर कथित नोकिया 5.1 प्लस च्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप चा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो बॅक पॅनल वर मध्येच आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट पण आहे.

रियर कॅमेरा सेटअप च्या खाली फिंगर​प्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे आणि या स्कॅनर च्या खाली नोकिया लोगो आहे. फोन च्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आले आहेत. फोन च्या वरच्या पॅनल वर 3.5एमएम आॅडियो जॅक तर खालच्या पॅनल वर यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. पण नोकिया 5.1 प्लस चा हा फोटो किती खरा आहे आणि हा फोन कधी बाजारात येईल यासाठी एचएमडी ग्लोबल च्या अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here