The Night Manager Trailer झाला रिलीज, या दिवशी स्ट्रीम होईल अनिल कपूरची ही सीरीज

Highlights

  • 17 फेब्रुवारीला The Night Manager रिलीज होईल.
  • ही सीरीज Disney Plus HotStar वर स्ट्रीम करता येईल.
  • या शोमधून आदित्य रॉय कपूर ओटीटी वर डेब्यू करत आहे.

The Night Manager Web Series चा ट्रेलर रिलीज झाला आहे. यात Anil Kapoor आणि Aditya Roy Kapur यांची जोडी दिसेल. अ‍ॅक्शन वेब सीरीज द नाइट मॅनेजर यावर्षीच्या बहुप्रतीक्षित शोज पैकी एक आहे. हा डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज केला जाईल, ज्याच्या माध्यमातून आदित्य रॉय कपूर ओटीटी डेब्यू करेल. विशेष म्हणजे ही सीरीज Hugh Laurie आणि Tom Hiddleston च्या British series चा हिंदी रीमेक आहे. चला जाणून घेऊया द नाइट मॅनेजरच्या रिलीज डेट बाबत …

The Night Manager Trailer

The Night Manager मध्ये अनिल कपूर अंडरवर्ल्डच्या विश्वावर राज्य करणार्‍या बेताज बादशाहची भूमिका साकारत आहे. अनिल कपूर या शो मध्ये नकारात्मक भूमिका करत आहे. तर आदित्य सीरीजमध्ये एक हॉटेलच्या नाइट मॅनेजर बनला आहे जो पोलिसांसह अनिल कपूरला अटक करण्यासाठी प्रयत्न करत आहे. द नाइट मॅनेजरमध्ये आदित्य एका माजी सैनिकाची भूमिका साकारत आहे, जो एका हॉटेलमध्ये नाइट मॅनेजर म्हणून काम करत आहे. सीरीजची संपूर्ण गोष्ट बेकायदा हत्यारे आणि त्यांच्या व्यापारावर अवलंबून आहे. 35 हजारांच्या रेंजमध्ये लाँच होऊ शकतो OnePlus 11R, फोनमध्ये मिळेल 16GB RAM + 512GB Storage

द नाईट मॅनेजरमध्ये सुपरस्टार अनिल कपूर हॉलिवूड सिरीजमधील ह्यू लॉरीची भूमिका साकारताना दिसणार आहे. दुसरा आदित्य रॉय कपूर टॉम हिडलस्टनची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिरीजमध्ये अनिल कपूर आर्म डीलरच्या भूमिकेत आहे. तर आदित्य हॉटेल मॅनेजरच्या भूमिकेत आहे.

ट्रेलरमध्ये अ‍ॅक्शन भरपूर दाखवण्यात आली आहे. या सीरीजमध्ये अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूर व्यतिरिक्त शोभिता धुलिपाला, तिलोत्तमा शोम, अरिस्ता सिंह मेहता शाश्वत चटर्जी, रवी बहल सारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. Vivo नं लाँच केला ‘अस्सल’ 5G Phone! 11 बँडचा सपोर्ट आणि 8GB रॅमसह Y55s 5G लाँच

आदित्य व्यतिरिक्त यावर्षी ओटीटीवर अनेक बॉलीवुड सेलिब्रिटी पदार्पण करत आहेत. आदित्यआधी शाहिद कपूरची डेब्यू वेब सीरीज फर्जी 10 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. ही सीरीज प्राइम व्हिडीओवर येईल. तसेच वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा, करीना कपूर खान सारखे कलाकार ओटीटीवर पहिल्यांदा दिसतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here