Oppo ने दाखवला जगातील पहिला फोन ज्यात स्क्रीन खाली लपला आहे कॅमेरा, बघा हा वीडियो

कॅमेरा मध्ये मोठे पिक्सेल जरी इतर कोणाकडे असले तरी कॅमेरा टेक्नॉलॉजी मध्ये इनोवेशन तर ओपो कडेच आहे. गेल्या वर्षी कंपनीने Oppo Find X लॉन्च केला होता. तसेच अलीकडेच Oppo Reno आणला आहे ज्यात शार्कफिन स्टाइल मध्ये सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. पण कंपनीचे इनोवेशन तिथेच थांबले नाही आणि आता एक नवीन प्रकारचा कॅमेरा सादर करणार आहे जो पूर्णपणे लपलेला असेल आणि वापरच्या वेळी पॉप-अप होऊन बाहेर देखील येणार नाही. कंपनीने आपल्या पहिल्या इन डिस्प्ले कॅमेर्याच डेमो दिला आहे. ओपो ने आपल्या ट्विटर अकाउंट वरून एक वीडियो शेयर केला आहे ज्यात कंपनीने आपला पहिला इन स्क्रीन कॅमेरा फोन दाखवला आहे.

इन स्क्रीन कॅमेरा बद्दल खूप आधीपासून चर्चा सुरु होती आणि Samsung व Xiaomi समवेत अनेक कंपन्यांनी याचे पेटेंट पण केले आहे. परंतु ओपो ने हा सर्वात आधी दाखवला आहे. हा अजूनही प्रोटो टाइप फोन आहे आणि यानंतर हा अधिकृतपणे लॉन्च केला जाईल. पण कधी याची माहिती मिळाली नाही परंतु कॅमेरा फंक्शन कपंनीने वीडियो मध्ये खूप चांगल्या प्रकारे दाखवला आहे.

वीडियो मध्ये तुम्ही बघू शकता कि एक कर्व्ड डिस्प्ले वाला हँडसेट आहे. त्यात कंपनीने कॅमेरा ऑन केल्यांनतर वर एक एनिमेशन रिंग येतो आणि फ्रंट कॅमेरा ऑन होतो. पण संपूर्ण स्क्रीन बघितल्यावर पण तुम्हाला कुठेही कॅमेरा दिसणार नाही परंतु जिथे रिंग आहे तिथे बोट ठेवल्यास कॅमेरा झाकला जातो. कंपनीने वीडियो शेयर करताना सोबत लिहिले आहे ”ज्या लोकांना पूर्णपणे बेजल लेस फोनचा अनुभव हवा आहे त्यांनी हैराण होण्यास तयार व्हावे.” तसेच खाली लिहिले आहे कि ”तुम्ही आमच्या पहिल्या अंडर डिस्प्ले कॅमेरा टेक्नॉलॉजीचा अनुभव घेत आहात.”

शेयर करण्यात आलेल्या वीडियो मध्ये फोनचा कॅमेरा तर योग्यरीत्या चालत आहे पण क्वालिटी बद्दल आता काहीच बोलता येणार नाही. कारण हा प्रोटोटाइप फोन आहे आणि हा अधिकृतपणे से लॉन्च होण्यास खूप वेळ लागेल आणि तेव्हाच कॅमेरा फीचर्स मध्ये अनेक नवीन बदल दिसतील. आधी सांगितल्याप्रमाणे ओपो ने फाइंड एक्स ने नवीन स्टाइलचा कॅमेरा मॉड्यूल सादर केला होता. तसेच इन स्क्रीन कॅमेऱ्याची सुरवात कंपनी फाइंड एक्स2 पासून करू शकते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here