लो बजेट Redmi A1+ स्मार्टफोन फक्त 7,499 रुपयांमध्ये भारतात लाँच

Redmi A1 plus price Specifications sale offer cheap xiaomi smartphone launched in india

Redmi A1+ Launch: काही वर्षांपूर्वी शाओमीनं आपली मी ब्रॅंडिंग बंद केली, सध्या शाओमी, रेडमी आणि पोको असे ब्रँड कंपनीच्या अंतर्गत येतात. यातील रेडमी ब्रँड बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्ससाठी ओळखला जातो. Xiaomi च्या रेडमी ब्रँडनं आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन मोबाइल फोन रेडमी ए1+ लाँच केला आहे. Redmi A1+ एक लो बजेट स्मार्टफोन आहे ज्याची किंमत 7,499 रुपयांपासून सुरु होते. या रेडमी मोबाइलमध्ये 120Hz Display, 3GB RAM, MediaTek Helio A22 चिपसेट आणि 5,000mAh Battery सारखे स्पेसिफिकेशन्स मिळतात, ज्यांची माहिती पुढे देण्यात आली आहे.

Redmi A1+ Price

रेडमी ए1 प्लस स्मार्टफोन भारतात दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. प्राइस पाहता रेडमी ए1+ चा 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 7,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल तर Redmi A1+ 3GB RAM + 32GB Storage 8,499 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. या रेडमी फोनची विक्री 17 ऑक्टोबरपासून सुरु होईल जो 31 ऑक्टोबरपर्यंत सेलमध्ये 500 रुपये डिस्काउंटसह विकला जाईल. Redmi A1+ फोन Black, Light Green आणि Light Blue कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: New OTT Releases This Week: धमाकेदार असेल वीकेंड, हे चित्रपट व सीरीज बघण्याचा बनवा प्लॅन

Redmi A1 plus price Specifications sale offer cheap xiaomi smartphone launched in india

Redmi A1+ Specifications

रेडमी ए1 प्लस स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर करण्यात आला आहे जो 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन स्क्रीन 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. कंपनीनं याला डॉटड्रॉप डिस्प्ले असं नाव दिलं आहे ज्याच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे. या फोनचे डायमेंशन 164.9×76.75×9.09एमएम आहे तर वजन 192ग्राम आहे.

Redmi A1 plus price Specifications sale offer cheap xiaomi smartphone launched in india

Redmi A1+ अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे जो मीयुआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या कोर्टेक्स-ए53 ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो ए22 चिपसेट देण्यात आला आहे. भारतीय बाजारात हा स्मार्टफोन 2जीबी रॅम व 3जीबी रॅमवर लाँच झाला आहे तसेच हे दोन्ही व्हेरिएंट 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात. मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून स्टोरेज 512जीबी पर्यंत वाढवता येते. रेडमी ए1 प्लस ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई वर चालतो. हे देखील वाचा: पेडल न मारताच ही सायकल चालेल 115km; Decathlon ची दमदार इलेक्ट्रिक सायकल लाँच

Redmi A1 plus price Specifications sale offer cheap xiaomi smartphone launched in india

फोटोग्राफीसाठी Redmi A1+ स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एआय लेन्स देखील आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा रेडमी फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here