मराठी युट्युबरचं OTT वर दणक्यात पदार्पण; ‘ऊंचाई’ सह या आठवड्यात हे चित्रपट आणि सीरिज रिलीज

2023 च्या पहिल्या आठवड्यात मनोरंजनाची जत्रा भरणार आहे. घर बसल्या चित्रपट आणि आणि वेब सीरीजची मजा घेणाऱ्या प्रेक्षकांसाठी यावेळी ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि वेब सीरीज रिलीज (New OTT releases this week) होणार आहेत. हे चित्रपट आणि वेब सीरीज ओटीटी प्लॅटफॉर्मच्या मदतीनं घरात आरामात मोबाइल फोन, टीव्ही व लॅपटॉपवर बघता येतील. या आठवड्यात Amitabh Bachchan आणि Anupam Kher चा चित्रपट Unchai सोबतच मराठमोळ्या भुवन बाम (Bhuvan Bam) ची वेब सीरीज ताजा खबर (Taaza Khabar) देखल ऑनलाइन स्ट्रीम होण्यासाठी तयार आहे.

New OTT releases this week

  • UUNCHAI
  • PHONE BHOOT
  • TAAZA KHABAR
  • MUMBAI MAFIA: POLICE VS THE UNDERWORLD
  • SHARK TANK INDIA SEASON 2

UUNCHAI

या शुक्रवारी 6 जानेवारीला अमिताभ बच्चन, डेनी, बोमन ईरानी आणि अनुपम खेर स्टारर UUNCHAI ओटीटीवर रिलीज होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सूरज बडजात्यानं आहे. चित्रपट 6 जानेवारीला ZEE5 वर रिलीज होईल. मोठ्या पडद्यावर जादू दाखवल्यानंतर चित्रपट आता ओटीटीवर आपली ताकद आजमावणार आहे. हे देखील वाचा: 15 हजारांच्या रेंजमध्ये दणकट 5G Phone; दर्जेदार कॅमेऱ्यासह Redmi Note 12 5G फोन भारतात लाँच

PHONE BHOOT

Katrina Kaif चा supernatural comedy चित्रपट Phone Bhoot ओटीटी रिलीज झाला आहे. चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर बघता येईल. काही दिवसांपूर्वी चित्रपट प्राइम व्हिडीओ रेंट सेक्शनमध्ये आला होता. तर या आठवड्यात हा प्राइम मेंबरसाठी उपलब्ध झाला आहे. चित्रपटगुहांमध्ये या मुव्हीला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. तर IMDb वर प्रेक्षकांनी दहा पैकी 7 रेटिंग दिली आहे.

TAAZA KHABAR

मूळ मराठी असलेला हिंदी युट्युबर Bhuvan Bam आता OTT platform Disney+ Hotstar वर आपली Taaza Khabar वेब सीरीज घेऊन आला आहे. भुवनची ही नवीन वेब सीरीज 6 जानेवारीपासून डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येईल. ताजा खबरची निर्मिती बीबी की वाइन्स अंतगर्त रोहित राज करत आहे, जिचे दिग्दर्शन हिमांक गौरनं केलं आहे. सीरीजमध्ये मराठी अभिनेत्री Shriya Pilgaonkar भुवन भामच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार आहे.

MUMBAI MAFIA: POLICE VS THE UNDERWORLD

या आठवड्यात 6 जानेवारी शुक्रवारी आणखी एक शानदार वेब सीरीज मुंबई माफिया: पोलीस वर्सेस अंडरवर्ल्ड रिलीज होणार आहे. या सीरीजमध्ये 90 च्या दशकातील खतरनाक अंडरवर्ल्ड डॉनची गोष्ट दाखवण्यात आली आहे जो त्याच्या विरोधात जाणाऱ्या लोकांचा खुलेआम जीव घेत होता. ही क्राइम थ्रिलर सीरीज Netflix वर पाहता येईल. हे देखील वाचा: लयभारी! 200MP Camera सह आला स्वस्त रेडमी फोन! भारतात Redmi Note 12 Pro व Note 12 Pro Plus लाँच

SHARK TANK INDIA SEASON 2

Shark Tank India season 2 टीव्ही सोबतच ऑनलाइन देखील स्ट्रीम करता येईल. या शोचा दुसरा सीजन 2 जानेवारीपासून सुरु होत आहे. जो रोज 10 वाजता Sony TV सह SonyLIV app वर पाहता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here