चीनी कंपनी शाओमी भारतात खूप प्रसिद्ध आहे, ज्याचा अंदाज भारतीय स्मार्टफोन मार्केट मध्ये Xiaomi च्या मार्केट शेयर वरून पण येतो. पण, शाओमी वर पेटेंटच्या उल्लंघनाचा एक मोठा आरोप केला गेला आहे. हा आरोप इलेक्ट्रॉनिक कंपनी Philips ने केला आहे. यामुळे फिलिप्सने याबाबत मध्ये दिल्लीच्या हायकोर्टचा दरवाजा ठोठावला आहे. फिलिप्सने कोर्टात अर्ज केला आहे कि शाओमी त्यांच्या पेटेंटचे उल्लंघन करत आहे. फिलिप्सने शाओमीच्या त्या सर्व स्मार्टफोनच्या भारतातील विक्री वर बंदी घालण्याची मागणी केली आहे ज्यात Philips च्या पेटेंटचे उल्लंघन झाले आहे.
असे आहे प्रकरण
रिपोर्टनुसार शाओमीने फिलिप्सच्या UMTS एन्हान्समेंट (HSPA, HSPA+) पेटेंटचे उल्लंघन केले आहे, त्यामुळे फिलिप्सने शाओमीच्या काही स्मार्टफोनच्या विक्री, असेम्बलिंग, थर्ड पार्टी वेबसाइटच्या माध्यमातून विक्री आणि आयात (इंपोर्ट) वर बंदी घालण्यासाठी दिल्ली हायकोर्टाकडे अपील केली आहे.
शाओमी आणि फिलिप्सला बँकेत ठेवावे लागतील 1,000 कोटी रुपये
दिल्ली हायकोर्टने शाओमी आणि फिलिप्सला आपल्या भारतीय बॅंक अकाउंट मध्ये 1,000 कोटी रुपये बॅलेंस ठेवण्याचा आदेश पण दिला आहे. शाओमीने याबाबत अधिकृतपणे वर आतापर्यंत कोणतेही विधान केलेले नाही आहे. 27 नोव्हेंबरला आलेल्या एका आदेशात, दिल्ली उच्च न्यायालयाने असे म्हटले आहे.
18 जानेवारी 2021 ला होईल पुढील सुनवाई
कोर्टाने Xiaomi ला उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांची वेळ दिली आहे. 18 जानेवारी, 2021 ला केसवर पुढील सुनवाईची तारीख पण ठरवण्यात आली आहे.















