Nokia C22 आज भारतात लाँच करून कंपनीनं लो बजेट सेग्मेंटमध्ये आपलं स्थान मजबूत केलं आहे. HMD Global नं हा 4जी फोन भारतीय बाजारात सेलसाठी उपलब्ध केला आहे ज्याच्या किंमतीसह फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.
नोकिया सी22 ची किंमत
Nokia C22 दोन रॅम व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे ज्यात 2जीबी व 4जीबी रॅमचा समावेश आहे. हे दोन्ही व्हेरिएंट 64जीबी स्टोरेजला सपोर्ट करतात. फोनची किंमत 7,999 रुपयांपासून सुरु होते जो Charcoal, Sand आणि Purple कलरमध्ये विकत घेता येईल. या फोनमध्ये जियो पोस्टपेड सिम वापरल्यास एक्स्ट्रा बेनिफिट्स देखील दिले जात आहेत.
नोकिया सी22 चे फीचर्स
- ह्या नवीन नोकिया मोबाइलमध्ये 2GB Virtual RAM देण्यात आला आहे.
- हा नोकिया फोन IP52 सर्टिफाइड आहे ज्यामुळे पाणी व धुळीपासून सुरक्षित राहतो.
- Nokia C22 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईवर चालतो.
- सिक्योरिटीसाठी फोनमध्ये रियर फिंगर प्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
- या मोबाइल फोनमध्ये 3.5एमएम जॅक व एफएम रेडियो देखील मिळतो.
नोकिया सी22 चे स्पेसिफिकेशन्स
- 6.5” HD+ Display
- 2.5 Corning Gorilla Glass
Nokia C22 स्मार्टफोन 20:9 अॅस्पेक्ट रेशियोसह सादर करण्यात आला आहे जो 1600 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोन पॉलीकॉर्बोनेट यूनिबॉडी डिजाइनवर बनला आहे तसेच स्क्रीन 2.5 कोर्निंग गोरिल्ला ग्लासनं प्रोटेक्ट करण्यात आली आहे.
- Android 13 Go Edition
- Unisoc SC9863A SoC
Nokia C22 अँड्रॉइड 13 ‘गो’ एडिशनवर लाँच झाला आहे ज्यात गुगल गो अॅप्स डाउनलोड व इन्स्टाल करता येतात. प्रोसेसिंगसाठी ह्या मोबाइल फोनमध्ये 1.6गीगहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला Unisoc SC9863A प्रोसेसर देण्यात आला आहे.
- 13MP Dual Rear Camera
- 8MP Selfie Camera
फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर + 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी नोकिया सी22 स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
- 5000mAh Battery
पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. हा नोकिया फोन 10वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.