अत्यंत कमी किंमतीत लाँच होऊ शकतो POCO C50; भारतातील लाँचची माहिती लीक

POCO C50 Launch price specifications leak details

फ्लॅगशिप फीचर्स स्वस्तात देण्यासाठी Xiaomi नं पोको नावाच्या सब-ब्रँडची सुरुवात केली होती. परंतु आता लो बजेट आणि मिड रेंज स्मार्टफोन्सच्या जोरावर POCO नं भारतात जम बसवला आहे. बाजारातील मोठ्या फॅन फॉलोइंगच्या बळावर पोको Realme सोबतच OPPO आणि Vivo ला देखील आव्हान देत आहे. पोको संबंधित नवीन बातमी येत आहे की कंपनी आपल्या नवीन स्मार्टफोन POCO C50 वर काम करत आहे जो लवकरच टेक मंचावर येऊ शकतो. पोको सी50 गुगल प्ले सपोर्टेड डिवायस लिस्टमध्ये स्पॉट केला गेला आहे त्यामुळे POCO C50 India Launch च्या चर्चानी जोर धरला आहे.

POCO C50 गुगल प्ले लिस्टिंगमध्ये 220733SPI मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे ज्याला snow असं कोडनेम देण्यात आलं आहे. या मॉडेल नंबरमधील ‘आय’ इंडियन व्हेरिएंट असल्याचे दर्शवतो. पोकोनं मात्र आपल्या या नवीन स्मार्टफोनबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही परंतु टेक विश्वात चर्चा आहे की हा पोको सी50 नावानं सादर होईल ज्याची किंमत देखील कमी असेल. फोनचे स्पेसिफिकेशन्स कसे असतील याची माहिती समोर येण्यासाठी वेळ लागू शकतो. कदाचित तुम्ही विसरला असाल की, पोकोनं आपला POCO C40 स्मार्टफोन भारतात लाँच केला नव्हता. हे देखील वाचा: अँड्रॉइडच्या मार्गावर Apple! यूएसबी टाइप सी पोर्ट आणि मोठ्या डिस्प्लेसह iPad, iPad Pro 2022 लाँच

POCO C50 Launch price specifications leak details

POCO C40 चे स्पेसिफिकेशन्स

Poco C40 स्मार्टफोनमध्ये 6.71-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आहे, ज्याचे रिजोल्यूशन 1560 x 720 पिक्सल, रिफ्रेश रेट 60Hz आणि ब्राइटनेस 400 निट्स आहे. पोकोच्या या फोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. त्याचबरोबर डिस्प्ले Corning Gorilla Glass प्रोटेक्शनसह येतो. Poco C40 स्मार्टफोन व्हिएतनाममध्ये JLQ JR10 SoC सह सादर करण्यात आला होता जो Android 11 आधारित MIUI वर चालतो.

POCO C50 Launch price specifications leak details

Poco C40 स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 13MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला 2MP चा डेप्थ सेन्सर आहे. तसेच फोन सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: व्हीएफएक्समुळे थिएटर गाजवणारा Brahmastra ‘या’ दिवशी होणार OTT वर रिलीज

कनेक्टिव्हीटीसाठी फोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट, 4G, ड्युअल बँड WiFi, Bluetooth 5.0, GNSS, आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट, 3.5mm हेडफोन जॅक आणि रियर माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे. Poco C40 स्मार्टफोनमध्ये 6,000mAh च्या बॅटरीसह 18W फास्ट चार्ज सपोर्ट देण्यात आला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here