Samsung Galaxy C55 लाँचच्या आधी पाहा ऑफलाईन स्टोरवर, लवकर होऊ शकते एंट्री

काही महिन्यापासून सॅमसंगच्या सी-सीरिज स्मार्टफोन Samsung Galaxy C55 ची माहिती लीक आणि सर्टिफिकेशन वेबसाईटवर समोर आली आहे. तसेच, आता डिव्हाईसच्या अधिकृत लाँचच्या आधी हा ऑफलाईन स्टोरवर समोर आला आहे. तसेच याला चीनच्या ऑफलाईन स्टोरमध्ये ऑरेंज आणि ब्लॅक कलरमध्ये स्पॉट करण्यात आला आहे. सांगण्यात आले आहे की नवीन मोबाईल या महिन्याच्या शेवटी सादर होऊ शकतो. चला, पुढे याची माहिती जाणून घेऊया.

Samsung Galaxy C55 रिअल फोटो (लीक)

  • तुम्ही खाली दिलेल्या फोटो मध्ये पाहू शकता की Samsung Galaxy C55 फोन चीनच्या कोणत्या ऑफलाईन स्टोरवर ऑरेंज आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये स्पॉट झाला आहे.
  • डिव्हाईसच्या बॅक पॅनलवर लेदर बॅक पाहायला मिळते. ज्यात कॉर्नरवर स्टिचिंग पण पाहिली जाऊ शकते. त्याचबरोबर ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश आहे.
  • फोनच्या बॅक पॅनलवर खालच्या बाजूला सॅमसंग ब्रँडिंग आणि साईडवर वॉल्यूम आणि पावर बटन देण्यात आले आहेत.
  • अपेक्षा केली जात आहे की हा डिव्हाईस Samsung Galaxy M55 5G चा रिब्रँड व्हर्जन आहे जो भारतात सेलसाठी उपलब्ध झाला आहे.
  • चीनच्या काही टेक ब्लॉगर्सनुसार गॅलेक्सी सी 55 26 एप्रिलला लाँच होऊ शकतो आणि याची सेल 28 एप्रिलपासून सुरु होणार असल्याची संभावना आहे.

Samsung Galaxy C55 ची किंमत (संभाव्य)

  • सॅमसंगने आतापर्यंत Samsung Galaxy C55 फोनच्या लाँचची घोषणा केलेली नाही, परंतु याच्या किंमतीबाबत लीक समोर आली आहे. सांगण्यात आले आहे की हा फोन दोन स्टोरेज मध्ये एंट्री घेऊ शकतो.
  • डिव्हाईसचे बेस मॉडेल 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज 1,999 युआन जवळपास 23,021 रुपयांचे असू शकते.
  • टॉप मॉडेल 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज 2,299 युआन म्हणजे जवळपास 27,000 रुपये ठेवले जाऊ शकते.

Samsung Galaxy C55 चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

  • डिस्प्ले: रिपोर्ट्सनुसार गॅलेक्सी सी55 मध्ये 6.7-इंचाचा S-अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यावर FHD+ रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळू शकतो.
  • प्रोसेसर: Samsung Galaxy C55 मध्ये परफॉरमेंससाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेट लावला जाऊ शकतो.
  • स्टोरेज: डिव्हाईसमध्ये 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळण्याची चर्चा आहे.
  • कॅमेरा: फोनमध्ये समोरच्या बाजूला सेल्फीसाठी 50 मेगापिक्सलचा कॅमेरा असू शकतो. तर बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिसला आहे. ज्यात 50 मेगापिक्सल + 8-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सल लेन्स असू शकते.
  • बॅटरी: Samsung Galaxy C55 मध्ये 45W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here