Vivo S19 series ची लाँच टाईमलाईन आली समोर, जाणून घ्या कधी लाँच होऊ शकतात हे नवीन स्मार्टफोन

विवोने गेल्यावर्षीच्या शेवटी आपली ‘एस18’ सीरिज चीनमध्ये सादर केली होती. या सीरिज अंतर्गत तीन मोबाईल फोन Vivo S18, Vivo S18 Pro आणि Vivo S18e लाँच केले होते. तसेच आता बातमी येत आहे की कंपनी या सीरिजची नेक्स्ट जेनरेशन Vivo S19 series वर काम सुरु केले आहे आणि जून 2024 वर मार्केटमध्ये आणले जाऊ शकते.

Vivo S19 series लाँच टाईमलाईन

विवो एस 18 सीरिजच्या लाँचची माहिती डिजिटल चॅट स्टेशनने मायक्रोब्लागिंग साइट वेईबोवर शेअर केली आहे. टिपस्टरने सांगितले आहे की Vivo S19 series वर्षाची दुसरी तिमाहीत समाप्त होण्याच्या आधी टेक मार्केटमध्ये आणले जाईल, तसेच याला जून महिन्यामध्ये अधिकृत केले जाऊ शकते. लीकनुसार विवोची अपकमिंग एस 19 सीरिज सर्वप्रथम ब्रँडच्या होम मार्केट चीनमध्ये लाँच होईल.

Vivo S19 series चे स्मार्टफोन

सध्या विवो एस19 सीरिजबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, परंतु अंदाज लावला जात आहे की, कंपनी या सीरिजमध्ये तीन मोबाईल फोन घेऊन येणार आहे. याचे बेस मॉडेल Vivo S19 असू शकते, तसेच याचे मोठे मॉडेल Vivo S19e नावाने आणले जाऊ शकते. तसेच एस 19 सीरिजचा सर्वात मोठा आणि महाग फोन Vivo S19 Pro नावाने लाँच होऊ शकतो.

Vivo S18 Pro चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले : यात 6.78 इंचाचा कर्व अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. ज्यावर 2800 x 1260 पिक्सल रिजॉल्यूशन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेश्यो, 120Hz रिफ्रेश रेट आणि 2800 निट्स पीक ब्राइटनेस मिळते.

प्रोसेसर: हा फोन अँड्रॉईड 14 आधारित ओरिजन ओएस 4 वर लाँच झाला होता. तसेच प्रोसेसिंगसाठी विवो एस 18 प्रो मध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 9200 प्लस चिपसेट देण्यात आली आहे. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये Mali-G715 Immortalis MP11 जीपीयू मिळतो.

कॅमेरा: हा फोन ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यात OIS फिचर असलेला 50MP Sony IMX920 मेन सेन्सर देण्यात आला आहे ज्यासोबत 50MP Samsung JN1 अल्ट्रावाईड लेन्स आणि 12MP Sony IMX663 टेलीफोटो सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी Vivo S18 Pro 50 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

बॅटरी: पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये जबरदस्त 5,000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर युजर्सना 80 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी पण मिळते.

इतर फिचर्स: हा मोबाईल पण इतर फिचर्सच्या बाबतीत वाय-फाय, ब्लूटूथ 5.3, यूएसबी टाइप सी, एनएफसी, जीपीएस, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक सारखे फिचर्स प्रदान करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here