बॉलीवुड सुपरस्टार शाहरुख खानचा चित्रपट ‘पठाण’ च्या स्क्रीनिंग दरम्यान चित्रपटगृहांमध्ये टीजर रिलीज केल्यानंतर कंपनीनं अधिकृतपणे POCO X5 Pro च्या भारतीय लाँचची घोषणा केली आहे. पोकोचा हा स्मार्टफोन भारतात 6 फेब्रुवारीला संध्याकाळी 5:30 वाजता लाँच केला जाईल. पोकोचा हा फोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
POCO X5 Pro गेल्यावर्षी लाँच केलेल्या POCO X4 Pro चा उत्तराधिकारी आहे आणि हा 5G नेटवर्कला सपोर्टसह लाँच केला जाईल. पोकोचा हा स्मार्टफोन शाओमीच्या Redmi Note 12 Speed Edition चा रीब्रँड व्हर्जन असू शकतो, जो अलीकडेच चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. फ्लिपकार्ट आणि POCO च्या वेबसाइटवरील या फोनच्या मायक्रोसाइटनुसार हा फोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसरसह लाँच होईल. या फोनचा AnTuTu बेंचमार्क स्कोर 545K+ आहे. म्हणजे बजेट सेग्मेंटमध्ये हा बेस्ट ऑप्शन बनू शकतो. हे देखील वाचा: पुन्हा एकदा बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी वनप्लसची तयारी; किफायतशीर OnePlus Nord 3 चे स्पेसिफिकेशन लीक
Show the world your X-factor and #UnleashX with next-level capabilities on the #POCOX5Pro 💪🏽
Loaded with,
✅Snapdragon®️ 778G processor
✅Breathtaking 120Hz Xfinity AMOLED Display
✅108MP Primary CameraArriving on 06-02-2023 @ 5:30PM.
Know more 👉🏻https://t.co/NEgUhmuD4w pic.twitter.com/fqtTcthZCT— POCO India (@IndiaPOCO) January 31, 2023
POCO X5 Pro specifications
- 6.67″ AMOLED 120Hz Display
- Qualcomm Snapdragon 778G
- 108MP Rear + 16MP Selfie Camera
- 67W + 5,000mAh Battery
पोको एक्स5 प्रो मध्ये 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.67 इंचाचा मोठा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले दिली जाऊ शकतो. ही स्क्रीन अॅमोलेड पॅनलवर बानू शकते जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकते. पोको एक्स5 प्रो क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. तसेच बेस्ट गेमिंगसाठी यात 12 लेयर असलेली कूलिंग सिस्टम मिळू शकते.
POCO X5 Pro मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाईल. यात 108MP Samsung HM2 प्रायमरी सेन्सर असेल, जोडीला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळू शकते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह बाजारात येऊ शकतो.
सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर मिळू शकतो. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करू शकतो. या फोनमध्ये ड्युअल सिम, आयआर ब्लास्टर, 3.5एमएम जॅक आणि X-Axis Linear Motor सारखे फीचर्स मिळू शकतात. हे देखील वाचा: अबब! तब्बल 240W फास्ट चार्जिंग! Realme GT Neo 5 च्या लाँचची कंपनीनं केली घोषणा
POCO X5 Pro Price
पोको एक्स5 प्रो भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच केला जाऊ शकतो. बेस मॉडेलमध्ये 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते तर मोठा व्हेरिएंट 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेजला सपोर्ट करू शकतो. POCO X5 Pro ची प्राइस 21,000 हजारांच्या आसपास सुरु होऊ शकते आणि मोठ्या व्हेरिएंटची किंमत 23,000 च्या आसपास असू शकते.