OnePlus ये वर्ष भारतात OnePlus 11 आणि OnePlus 11R लाँच करून सुरु करू शकते, जे याच आठवड्यात 7 फेब्रुवारीला येतील. त्यानंतर कंपनी आपल्या नॉर्ड सीरिजचा विस्तार करणं अपेक्षित आहेत. यात OnePlus Nord 3 आणि Nord CE 3 अशा दोन मॉडेल्सचा समावेश केला जाऊ शकतो. आता वनप्लस नॉर्ड 3 च्या लाँच पूर्वीच या फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि डिजाईनची माहिती ऑनलाइन लीक झाली आहे.
OnePlus Nord 3 स्मार्टफोन बाजारात मीडियाटेकच्या Dimensity 8200 प्रोसेसरसह सादर केला जाऊ शकतो. यात 100W फास्ट चार्जिंग देखील मिळू शकते. तसेच या आगामी स्मार्टफोनची डिजाईन याच सीरिज मधल्या नॉर्ड 2टी सारखी दिसत आहे, ज्यात दोन वर्तुळाकार कॅमेरा मॉड्यूल आणि पंच होल कट आऊट आहे. हा फोन कधी लाँच होईल हे मात्र समजलं नाही परंतु हा मिड रेंज स्मार्टफोन असू शकतो. हे देखील वाचा: पेट्रोलविना चालणारी दणकट बाइक आली बाजारात; इतकी आहे PURE EV ecoDryft ची किंमत
OnePlus Nord 3 ची डिजाईन
OnePlus Nord 3 ची लीक डिजाईन पाहता या फोनच्या डिस्प्लेवर वरच्या बाजूला मध्यभागी एक पंच होल कट आऊट दिला जाऊ शकतो ज्यात सेल्फी कॅमेरा फिट केला जाऊ शकतो. पावर बटन आणि अलर्ट स्लायडर फोनच्या उजव्या पॅनलवर असू शकतो, तर व्हॉल्युम रॉकर डावीकडे दिला जाऊ शकतो. फोनच्या मागे दोन वर्तुळाकार कॅमेरा मॉड्यूल दिसत आहेत. ज्यातील वरच्या रिंगमध्ये प्रायमरी कॅमेरा मिळेल तर खालच्या रिंगमध्ये दोन सेन्सर असू शकतात.
OnePlus Nord 3 चे लीक स्पेसिफिकेशन्स
लिक्सनुसार OnePlus Nord 3 मध्ये 6.74 इंचाचा 1.5के अॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. या फोनमध्ये 4nm प्रोसेसरवर बनेलला मीडियाटेकचा Dimensity 8200 चिपसेट दिला जाऊ शकतो जोडीला Mali-G610 MC6 जीपीयू मिळू शकतो, त्यामुळे दमदार परफॉर्मन्स अपेक्षित आहेत. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 13 आधारित ऑक्सिजनओएस 13.1 मिळू शकतो. हे देखील वाचा: Indian Gadget Awards 2022: हे आहेत देशातील सर्वात मोठ्या मोबाइल अवॉर्डचे विजेते
फोटोग्राफीसाठी OnePlus Nord 3 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. परंतु यातील कॅमेरा सेन्सरची माहिती मात्र अजून समोर आली नाही. लिक्सनुसार या फोनमध्ये 64MP चा ओम्नीव्हिजन सेन्सर किंवा 50MP चा सोनी IMX890 सेन्सर मेन कॅमेरा म्हणून दिला जाऊ शकतो. जोडीला एक 8MP ची अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2MP चा सेन्सर मिळू शकतो. OnePlus Nord 3 मध्ये 4,500 किंवा 5,000mAh ची बॅटरी मिळू शकते, जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते.