अबब! तब्बल 240W फास्ट चार्जिंग! Realme GT Neo 5 च्या लाँचची कंपनीनं केली घोषणा

Highlights

  • रियलमीनं आगामी Realme GT Neo 5 च्या लाँच डेटची घोषणा केली आहे.
  • Realme GT Neo 5 येत्या 9 फेब्रुवारीला सर्वप्रथम चीनमध्ये लाँच केला जाईल.
  • अधिकृत टीजरमधून 240W फास्ट चार्जिंगची पुष्टी

या महिन्याच्या सुरुवातीला Realme नं आपल्या 240W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीची घोषणा केली होती आणि सांगितले होते की कंपनीच्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये ही टेक्नॉलॉजी देण्यात येईल. लिक्समधून असं सांगण्यात आलं होतं की आगामी Realme GT Neo 5 मध्ये या टेक्नॉलॉजीचा समावेश करण्यात येईल. आता खुद्द रियलमीनं आपल्या नव्या स्मार्टफोन GT Neo 5 च्या लाँच डेटची घोषणा केली आहे आणि यातील 240W फास्ट चार्जिंग देखील कंपनीनं टीज केली आहे.

टेक वेबसाइट प्राइसबाबाच्या एका रिपोर्टमधून समजलं आहे की हा फोन कंपनी मोबाइल वर्ल्ड काँग्रेस 2023 मध्ये सादर करेल जो 27 फेब्रुवारी आणि 2 मार्च दरम्यान बार्सिलोनामध्ये आयोजित केला जाईल. परंतु कंपनी नव्या जीटी नियो 5 साठी वेगळी योजना आखात आहे. हा फोन पुढील आठवड्यात ग्राहकांच्या भेटीला येत आहे. हे देखील वाचा: पेट्रोलविना चालणारी दणकट बाइक आली बाजारात; इतकी आहे PURE EV ecoDryft ची किंमत

Realme GT Neo 5 ची लाँच डेट ठरली

रियलमीनं चायनीज मायक्रो ब्लॉगिंग साईट विबोवर अधिकृत टीजर शेयर केला आहे. त्यानुसार Realme GT Neo 5 स्मार्टफोन येत्या 9 फेब्रुवारीला चीनमध्ये लाँच केला जाईल. टीजरमधून स्मार्टफोनच्या 240वॅट फास्ट चार्जिंगचा खुलासा झाला आहे. याआधी आलेल्या माहितीनुसार हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये लाँच होईल ज्यातील एकात 240W फास्ट चार्जिंग मिळेल तर एक 150W चार्जिंग स्पीड देईल.

Realme GT Neo 5 चे संभाव्य स्पेक्स

लिक्सनुसार, Realme GT Neo 5 स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा मोठा डिस्प्ले मिळेल, जो 2,772×1,240 पिक्सेल रिजोल्यूशनला सपोर्ट करणारा 1.5K ओएलईडी डिस्प्ले असेल आणि 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. प्रोसेसिंगसाठी Realme GT Neo 5 स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर देण्यात येईल. जोडीला 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 512GB पर्यंत UFS4.0 स्टोरेज दिली जाऊ शकते.

Realme GT Neo 5 मध्ये Android 13 आधारित रियलमी युआय 4.0 ची स्किन मिळू शकते. या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Realme GT Neo 5 स्मार्टफोनमध्ये 50MP Sony IMX890 सेन्सर प्रायमरी कॅमेऱ्याचे काम करेल, जोडीला 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि 2MP चा माक्रो कॅमेरा मिळेल. फोनमधील फ्रंट कॅमेऱ्याची माहिती मात्र अद्याप मिळाली नाही. हे देखील वाचा: पुन्हा एकदा बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी वनप्लसची तयारी; किफायतशीर OnePlus Nord 3 चे स्पेसिफिकेशन लीक

Realme GT Neo 5 स्मार्टफोन दोन वेगवेगळ्या बॅटरी आणि फास्ट चार्जिंग व्हेरिएंटसह लाँच होईल. यातील एका मॉडेलमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात येईल जो 150W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. तर दुसऱ्या मॉडेलमध्ये 4,600mAh ची छोटी बॅटरी मिळेल परंतु हा व्हेरिएंट 240W च्या दणकट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल, त्यामुळे काही मिनिटांतच हा हँडसेट फुलचार्ज होईल. हा डिवाइस इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करेल आणि यात एक प्लास्टिक फ्रेम देण्यात येईल. टिपस्टरनुसार, Realme GT Neo 5 मध्ये RBG लाइट्सचं फिचर असेल, जे पहिल्यांदाच कंपनीच्या स्मार्टफोनमध्ये मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here