Panda Mini Electric Car मध्ये मिळते 150KM ची रेंज; चीनमध्ये 5 लाखांपेक्षा कमी आहे हिची किंमत

चिनी ऑटो मेकर कंपनी Geely नं आपल्या होम मार्केटमध्ये एक छोटी आणि क्यूट इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. कंपनीनं हिला पांडा मिनी ईव्ही असं नाव दिलं आहे. या ई-कारचा आकार खूप छोटा आहे त्यामुळे यात एकावेळी फक्त 4 लोकच प्रवास करू शकतात. जर या इलेक्ट्रिक कारची खासियत पाहता कंपनीनं यात LFP बॅटरी पॅक दिला आहे, ज्यामुळे सिंगल चार्जमध्ये ही Mini Electric Car 150 किलोमीटरची रेंज देते. चला जाणून घेऊया हिची प्राइस, फीचर्स आणि फोटोज.

Geely Panda Mini Electric Car ची किंमत

याची किंमत 40,000 युआन म्हणजे जवळपास 5 लाख रुपये आहे. तसेच या कारची विक्री 2023 पासून सुरु होईल. ही बाजारातील वूलिंग होंगगँग मिनी ईव्ही आणि एमजी एयर ईव्हीला टक्कर देईल, अशी चर्चा आहे. या ई-कारच्या भारतीय लाँचची मात्र कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. हे देखील वाचा: बाबो! फोन आहे की लॅपटॉप! 16GB रॅम, 165W 6000mAh बॅटरी आणि न दिसणारा सेल्फी कॅमेरा

डिजाईन आणि लूक

Geely Panda Mini Electric Car एखाद्या पांडा प्रमाणे ब्लॅक-व्हाइट अ‍ॅक्सेंटमध्ये सादर करण्यात आली आहे. यात ब्लॅक रूफ, राउंड हेडलाइट्स, दोन दरवाजे, चार सीट्स देण्यात आल्या आहेत. या छोट्या कारची लांबी फक्त 3,065mm आहे, त्यामुळे पार्किंगसाठी जास्त जागा लागत नाही आणि ट्राफिकमध्ये सहज ड्राईव्ह करता येईल. या कारमध्ये पॅनोरमिक ग्लॉसरूफ देण्यात आला आहे, तसेच व्हील्स पांडाच्या फुट प्रिंट्सनी सजवण्यात आले आहेत.

बॅटरी आणि रेंज

Geely Panda मध्ये कंपनीनं पावरसाठी 30kW क्षमता असलेली इलेक्ट्रिक मोटर आणि LFP बॅटरी पॅक दिली आहे, जी चीनच्या Guoxuan Hi-Tech कंपनीनं तयार केली आहे. कंपनीचा दावा आहे की ही कार सिंगल चार्जमध्ये 150 किलोमीटर पर्यंतचा प्रवास करू शकते. एक सिटी कार म्हणून ही एक चांगला पर्याय ठरू शकते, जी दैनंदिन गरजा लक्षात ठेऊन मोठ्या रेंजसह सादर करण्यात आली आहे. हे देखील वाचा: वनप्लस टक्कर देण्यासाठी सॅमसंग पुन्हा सादर करणार फॅन एडिशन; Galaxy S22 FE ची नवी माहिती लीक

या कारमध्ये 9.2 इंचाचा इंस्ट्रमेंट क्लस्टर देण्यात आला आहे आणि यात 8 इंचाचा एक अतिरिक्त डिस्प्ले देखील मिळतो, जो सेंटर कंट्रोल स्क्रीनप्रमाणे पोजिशन करण्यात आला आहे. यात ब्लूटूथ फोन कनेक्टिव्हिटी, इंटरकॉम फंक्शन, डेस्टिनेशन शेयरिंग सारखे फीचर्स देखील मिळतात. तुम्ही अधिकृत मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून कारचं एयर कंडिशन (AC), ट्रंक आणि अनेक अन्य कंपोनेंट्स रिमोटली कंट्रोल करू शकता. तसेच तुम्ही मोबाइल फोनद्वारे कार लॉक आणि अनलॉक देखील करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here