PUBG Mobile चे भारतात होत आहे पुनरागमन! जाणून घ्या कधी होईल लॉन्च

PUBG Mobile भारतात बॅन झाल्यानंतर याच्या पुनरागमनाबाबत बातम्या येत होत्या. दिवाळीच्या एक दिवस आधी पबजी कॉर्पोरेशनने भारतात हा गेम लवकरच पुनरागमन करण्याची घोषणा करून युजर्सना मोठी भेट दिली. बोलले जात आहे कि यावेळी हा PUBG Mobile India नावाने लॉन्च केला जाईल.

तसेच आता डेवलपर्सने स्पष्ट केले आहे कि PUBG मोबाईल इंडिया अपडेट वर्जन ऑनलाइन बॅटल ग्राउंड गेमच्या मूळ ग्लोबल वर्जन पेक्षा वेगळा असेल. नवीन अपडेटनुसार, जुनी PUBG मोबाईल आयडी ग्लोबल वरून PUBG Esport भारतीय गेमिंग ग्रुप मध्ये स्थानांतरित केली जाईल. तसेच रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि युजर्सना इन-गेम स्किन विकत घेण्याचा ऑप्शन असेल.

नवीन वेबसाइट झाली लॉन्च

काही दिवसांपूर्वीच पबजी कॉर्पोरेशनने PUBG Mobile India ची नवीन वेबसाइट (PUBG Mobile India Website) लॉन्च केली होती. यावर ‘कमिंग सून’ टॅगलाइन देण्यात आली आहे. तसेच वेबसाइट वर पबजी मोबाईल इंडियाच्या फेसबुक व इंस्टाग्राम पेज आणि यूट्यूब चॅनेलची लिंक पण पोस्ट करण्यात आली आहे.

कधी लॉन्च होईल पबजी मोबाईल इंडिया

पबजी कॉर्पोरेशनने पबजी मोबाईल इंडियाच्या लॉन्च डेटचा खुलासा अजून केला नाही. पण वेबसाइट वर ‘कमिंग सून’ चा मेसेज लिहिण्यात आला आहे. टीजर वरून संकेत मिळाले आहेत कि पबजी मोबाईल इंडिया लवकरच लॉन्च केला जाऊ शकतो.

100 मिलियन यूएस डॉलरची गुंतवणूक

पबजी मोबाईल इंडियाच्या लॉन्चची माहिती देत कंपनीने सांगितले आहे कि क्रॉफ्टन आणि पबजी कॉरपोरेशन कंपनी आपल्या नवीन मोबाईल गेम वर्जनसाठी भारतात 100 मिलियन यूएस डॉलरची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीच्या माध्यमातून कंपनी लोकल व्हिडीओ गेमिंग सोबतच आईटी इंडस्ट्री आणि इंटरटेनमेंटच्या व्यवसायात विस्तार करेल. तसेच PUBG MOBILE INDIA सह युजर्सच्या प्राइवेसी आणि सिक्योरिटीला पण कंपनीने प्राधान्य दिले आहे.

टेलीकॉम कंपनी सह हो सकती आहे भागेदारी

गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे रिपोर्ट्स मध्ये समोर आले आहेत कि PUBG भारतात कमबॅक करण्यासाठी टेलीकॉम कंपन्यांसोबत भागीदारी करू शकते. या कंपन्यांमध्ये Airtel आणि Reliance Jio ची नावे पण समोर आली होती. टेलिकॉम कंपन्यांची हि नावे फक्त अफवा असल्याचे बोलले जात आहे पण जर PUBG MOBILE INDIA ची एयरटेल किंवा जियो सोबत डील झाली तर यामुळे या कंपन्यांना पबजी मोबाईलच्या वितरणाचे अधिकार मिळतील.

लक्षात असू द्या क्या कि काही दिवसांपूर्वी PUBG चे डेवलपर आणि पब्लिशर PUBG कॉर्पोरेशन द्वारे LinkedIn वर एक जॉब पोस्ट पण करण्यात आली आहे. हि पोस्ट ‘कॉर्पोरेट डेवलपमेंट डिविजन मॅनेजर’ च्या पदासाठी पब्लिश केली गेली. हि पोस्ट समोर आल्यावर चर्चा सुरु झाली होती कि पबजी भारतात आपली नवीन सुरवातीची तयारी करत आहे आणि यासाठी नवीन मॅनेजमेंट आणि टीमची निर्मिती केली जात आहे. तसेच आज कंपनीद्वारे PUBG MOBILE INDIA ची अधिकृत घोषणा केल्यानंतर पबजी मोबाईलचे पुनरागमन पण निश्चित झाले आहे आणि देशातील पबजी फॅन्स मध्ये पुन्हा आनंदाची लहर आली आहे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here