पॉप्यूलर ऑनलाइन गेम पबजी खेळण्याचे व्यसन जीव घेणे ठरू शकते. ऐकताना जरी हे चांगले वाटले नाही तर असे अनेक रिपोर्ट्स समोर येत आहेत, ज्यात पबजीमुळे लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
एका रिपोर्ट नुसार PUBG खेळताना 25 वर्षीय पबजी प्लेयरला ब्रेन स्ट्रोक आला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. PTI च्या बातमीनुसार गेल्या गुरुवारी पबजी गेम खेळताना पुण्यातील रावेत मध्ये राहणाऱ्या हर्शल देवीदासला हार्ट अटॅक आला, त्यानंतर हर्शलला जवळच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.
त्यानंतर हर्शलला दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये रेफर करण्यात आले, जिथे शुक्रवारी उपचारादरम्यान हर्शलने जीव सोडला. याबाबती डॉक्टर्सनी आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितले कि हर्शलच्या नवर्स सिस्टम मध्ये स्ट्रेच आल्यामुळे त्याच्या रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह बंद झाला होता, ज्यामुळे त्याला हार्ट अटॅक आला. हा हार्ट अटॅक हर्शलच्या मृत्येचे कारण बनला.
हर्शलच्या घरच्यांनुसार हार्ट अटॅक हर्शलला पबजी खेळताना आला. पोलिसांनी सांगितले कि नर्वस सिस्टम मध्ये स्ट्रेचमुळे मेंदूच्या टिश्यू मध्ये ब्लिडिंग होऊ लागली ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण पबजी असल्याची हि पहिली वेळ नाही. याआधी पण अनेक तरुणांच्या मृत्यूचे कारण PUBG ला ठरवण्यात आले आहे.
अलीकडेच PUBG ला Blue Whale प्रमाणे घातक आहे म्हणून हा बॅन करण्याच्या याचिकेवर पंजाब-हरियाणा हायकोर्टाने केंद्र सरकारला यावर बंदीचा निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे. काही दिवसांपूर्वी एचसी अरोडा यांनी हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत सांगण्यात आले होते कि हा गेम लहान मुलांना आपले व्यसन लावतो. जास्त वेळ हा गेम खेळणाऱ्या यूजर्सचा शारीरिक आणि मानसिक विकास कमी होतो.
इतकेच नव्हे तर या याचिकेत सांगण्यात आले आहे कि गेम मध्ये हत्यारे घेऊन खेळाडू असतात जे त्वेषाने एकमेकांवर हल्ला करतात ज्यामुळे मुलांमध्ये हिंसक प्रवृत्ती वाढते. गेम मुळे जीव जाण्याची हि काही पहिली वेळ नाही. याआधी पण गेम खेळल्यामुळे काही ना काही कारणास्तव तरुणांचा जीव गेला आहे.















