जीबी व्हॉट्सअ‍ॅप म्हणजे काय? वापरल्यामुळे डेटा जातो का चोरीला? कसं डाउनलोड करायचं? जाणून घ्या

What is GB WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅप हे जगभरातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेंजर आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर युजर्सना अनेक फिचर्स मिळतात आणि वेळावेळी अपडेट्समधून नवीन फिचर देखील येत असतात. परंतु काही फीचर्स या लोकप्रिय मेसेंजरवर सुरक्षेच्या कारणांमुळे मिळत नाहीत. जे व्हॉट्सअ‍ॅपच्या क्लोन अ‍ॅप जीबी व्हॉट्सअ‍ॅप (GB WhatsApp) वर मिळतात. तुम्ही अनेकांकडून ऐकलं असेल की व्हॉट्सअ‍ॅप वापरत आहेत. आज आपण जाणून घेऊया की GB WhatsApp म्हणजे काय आणि हे कसं वापरायचं? तसेच जीबी व्हॉट्सअ‍ॅपचा सुरक्षित आहे का हे देखील जाणून घेऊया.

जीबी व्हॉट्सअ‍ॅप म्हणजे काय?

What is GB WhatsApp: जीबी व्हॉट्सअ‍ॅप पॉपुलर इन्स्टंट मेसेंजर अ‍ॅप WhatsApp चं क्लोन अ‍ॅप आहे जो ऑरिजनल अ‍ॅपच्या आधारावर बनला आहे आणि यात अनेक अतिरिक्त इंटरेस्टिंग फीचर्स देखील मिळतात. अशाप्रकारे क्लोन अ‍ॅप व्हर्जन्सना मोडेड अ‍ॅप्स असं देखील म्हटलं जातं. हे क्लोन अ‍ॅप अधिकृत नसतात त्यामुळे गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करता येत नाहीत. असे अ‍ॅप्स थर्ड पार्टी अ‍ॅप स्टोरवरून डाउनलोड करावे लागतात. जीबी व्हॉट्सअ‍ॅपच्या फीचर्स माहिती घेऊया.

जीबी व्हॉट्सअ‍ॅपचेके फीचर्स

मोठ्या आकाराची फाइल पाठवता येते

एकेकाळी व्हॉट्सअ‍ॅपवर युजर्स 16MB पेक्षा मोठी फाइल सेंड करता येत नव्हती. जो व्हॉट्सअ‍ॅपमधील सर्वात मोठा दोष होता. तेव्हा GB WhatsApp च्या मदतीनं युजर्स 100MB पर्यंतच्या फाइल सेंड करू शकत होते. यंदा ऑफिशियल व्हॉट्सअ‍ॅपनं फाइलची साइज 2GB पर्यंत वाढवली आहे.

ऑनलाइन आणि टाइपिंग स्टेटस लपवता येतं

GB WhatsApp वर तुम्हाला प्रायव्हसीसाठी जास्त कंट्रोल मिळतो. या अ‍ॅपमध्ये ऑनलाइन स्टेटस, टाइपिंग स्टेटस आणि व्हॉइस रेकॉर्डिंग स्टेटस हाइड करण्याचा ऑप्शन मिळतो. म्हणजे तुम्ही ऑनलाइन असून देखील समोरच्या व्यक्तीला कळणार नाही, तसेच तुम्ही टायपिंग करत आहात किंवा व्हॉइस रेकॉड करत आहात हे देखील लपवता येतं.

शेड्यूल मेसेज

GB WhatsApp वर युजर्सना मेसेज शेड्यूल करण्याचा अ‍ॅडव्हान्स ऑप्शन मिळतो. म्हणजे तुम्ही एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छांचा मेसेज रात्री 12 पर्यंत न जागता आधीच शेड्युल करू शकता. जीबी व्हॉट्सअ‍ॅप तो मेसेज ठरलेल्या वेळी पाठवून देईल.

DND

जर तुम्हाला काही काळ व्हाट्‌सअ‍ॅपवर मेसेज नको असतील आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी चालू हवी असेल तर तुम्ही जीबी व्हॉट्सअ‍ॅपच्या डू-नॉट-डिस्टर्ब फिचरचा वापर करू शकता.

डिलीट केलेले मेसेज वाचा

व्हॉट्सअ‍ॅपवर युजर्स डिलीट केलेले मेसेज वाचू शकत नाहीत. परंतु व्हॉट्सअ‍ॅपच्या क्लोन व्हर्जन जीबी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये सेंडरने डिलीट केलेले मेसेज वाचण्याचा पर्याय मिळतो.

स्टेटस अपडेटमध्ये अधिक कॅरेक्टर लिमिट

जीबी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये युजर्सना ऑरिजनल व्हॉट्सअ‍ॅपच्या तुलनेत स्टेटस अपडेट करण्यासाठी जास्त कॅरेक्टर्स मिळतात.

स्टेटस डाउनलोड

जीबी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये युजर्सना दुसऱ्यांच्या स्टेटसमधील इमेज आणि व्हिडीओ डाउनलोड करण्याचा ऑप्शन मिळतो.

हाय-रिजोल्यूशन इमेज पाठवता येतात

जीबी व्हॉट्सअ‍ॅपवरून युजर्स हाय रिजोल्यूशन पिक्चर पाठवू शकतात. ऑरिजनल व्हॉट्सअ‍ॅपमध्ये इमेज साइज कॉम्प्रोमाइज होते.

फोटो गॅलरीमध्ये मीडिया फाइल्स हाइड करता येतात

व्हॉट्सअ‍ॅपवर युजर्स मीडिया फाइल फोटो गॅलरीमध्ये हाइड करण्याचा ऑप्शन मिळत नाही. परंतु GB WhatsApp मध्ये हे फीचर आहे.

GB WhatsApp सुरक्षित आहे?

क्लोन किंवा मोडेड अ‍ॅप सामन्यात सुरक्षित नसतात आणि त्याला GB WhatsApp देखील अपवाद नाही. WhatsApp क्लोन आणि मोडेड अ‍ॅप युजर्सना बॅन करू शकतं. जीबी व्हॉट्सअ‍ॅपचे मेसेज एन्ड टू एन्ड इंक्रिप्टेड नसतात त्यामुळे युजर्सच्या पर्सनल सिक्योरिटीसाठी धोकादायक आहे. तुमचे मेसेज तिसरीच व्यक्ती वाचू शकते. तसेच जीबी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये युजर्सना जाहिराती दाखवल्या जातात. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवर लिस्टेड नाही त्यामुळे हे डाउनलोड करणे टाळावे. तरीही जर तुम्हाला जीबी व्हॉट्सअ‍ॅप वापरायचं असेल तर पुढे आम्ही याची पद्धत सांगितली आहे.

GB WhatsApp कसं डाउनलोड करायचं

स्टेप 1: स्मार्टफोनच्या ब्राउजरवर जा आणि GB WhatsApp apk सर्च करा. इथे तुम्हाला अनेक लिंक्स मिळतील, तिथून चांगले रिव्यू असलेलं अपडेटेड व्हर्जन डाउनलोड करा.

स्टेप 2: APK फाइल डाउनलोड झाल्यानंतर ही एपीके फाइल इंस्टॉल करा.

स्टेप 3: ही फाइल इंस्टॉल करण्यासाठी तुम्हाला फोनमध्ये सिक्योरिटी सर्टिफिकेट एक्सपायर झाल्याचा मेसेज दिसेल. अ‍ॅप इंस्टॉलेशन प्रोसेस पूर्ण करा.

स्टेप 4: इंस्टॉलेशन प्रोसेस पूरा झाल्यानंतर जीबी व्हॉट्सअ‍ॅपवर मोबाइल नंबरसह साइन इन करा.

जीबी व्हॉट्सअ‍ॅप आणि व्हॉट्सअ‍ॅप एकच अ‍ॅप आहेत का?

GB WhatsApp (जीबी व्हॉट्सअ‍ॅप) ऑरिजनल व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) चा क्लोन आहे. जो मूळ अ‍ॅपच्या कोड वर आधारित आहे. म्हणजे जीबी व्हॉट्सअ‍ॅप आणि व्हॉट्सअ‍ॅप दोन्ही वेगवेगळे अ‍ॅप आहेत.

GB WhatsApp सुरक्षित आहे का?

नाही, जीबी व्हॉट्सअ‍ॅप वापरणं सुरक्षित नाही. GB WhatsApp च्या माध्यमातून पाठवण्यात आलेले मेसेज एन्ड टू एन्ड इंक्रिप्टेड नसतात त्यामुळे तुमची डेटा प्रायव्हसी धोक्यात येते.

जीबी व्हॉट्सअ‍ॅप वापरल्यावर व्हॉट्सअ‍ॅप बॅन करू शकतं का?

हो, व्हॉट्सअ‍ॅपची पॉलिसी आहे की ते मोडेड किंवा क्लोन अ‍ॅप वापरणाऱ्या युजर्सना आपल्या प्लॅटफॉर्मवरून तात्पुरतं किंवा कायमचं बॅन केलं जातं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here