PUBG खेळताना वाढला वाद, मित्रांनी केली मित्राची हत्या

प्रसिद्ध ऑनलाइन गेम पबजी खेळण्याचा शौक तुमचा जीव पण घेऊ शकतो. तुमचा यावर विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे. अनेक दिवसांपासून असे रिपोर्ट्स समोर येत आहेत, ज्यात पबजी मुळे लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता एक नवीन रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि पबजी खेळताना झालेला वाद इतका वाढला, ज्यात एक व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. जम्मू मध्ये घडलेल्या या घटनेनंतर या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार हि घटना जम्मूच्या सीमेलगतच्या आरएसपुरा मधील आहे, जिथे 31 वर्षीय दलीप राजची हत्या त्याच्या काही मित्रांनी केली आहे. मृत व्यक्ती आपल्या काही मित्रांसह ऑनलाइन गेम पबजी खेळात होता आणि तेव्हा काही कारणास्तव मित्रांमध्ये वाद निर्माण झाला ज्यानंतर दलीप राजची हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.

अलीकडेच एक बातमी समोर आली होती कि पंजाब मधील एका 17 वर्षीय युवकाला PUBG Mobile गेमचा इतका नाद लागला होता कि त्याने गेमसाठी आपल्या घरच्यांचे 16 लाख रुपये खर्च केले. मीडिया रिपोर्टनुसार 16 लाखांची हि मोठी रक्कम तरुणाने PUBG गेम मधील वेगवेगळ्या नवीन अपडेट, ड्रेस, हत्यार, कार आणि इतर गोष्टी खरेदी करण्यासाठी खर्च केले.

15 वर्षीय मुलाने उडवली आजोबांची पेन्शन

अशीच एक बातमी पंजाबच्या मोहाली मधून समोर आली होती जिथे एका 15 वर्षीय मुलाला PUBG खेळण्याची आवड अशी लागली कि त्याने आपला गेम अपग्रेड करण्यासाठी आपल्या आजोबांची पेन्शन खर्च केली. या मुलाने आजोबांच्या बँक अकाउंट मधील 2 लाख रुपये PUBG वर खर्च केले. या मुलाने पबजी खेळण्यासाठी फास्ट इंटरनेट मिळावे म्हणून घरच्यांपासून लपून एक वेगळा सिम-कार्ड पण विकत घेतला होता.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here