14,990 रुपयांमध्ये भारतीयांच्या भेटीला आला OnePlus Nord N20 SE

OnePlus Nord N20 SE Launch: वनप्लसनं भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन मोबाइल फोन सादर केला आहे. कंपनीनं वनप्लस नॉर्ड एन20 एसई भारतात लाँच केला आहे. हा Cheap OnePlus Phone म्हणजे कमी किंमत असलेला स्वस्त वनप्लस मोबाइल फोन आहे ज्याची किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. OnePlus Nord N20 SE 14,990 रुपयांमध्ये भारतात लाँच झाला आहे ज्याचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स, किंमत आणि सेलची माहिती पुढे देण्यात आली आहे.

OnePlus Nord N20 SE Price

वनप्लस नॉर्ड एन20 एसई स्मार्टफोन भारतात एकच व्हेरिएंटमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे. कंपनीनं सध्या या मोबाइल फोनची किंमत आपल्या वेबसाइटवर दाखवली नाही परंतु शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर OnePlus Nord N20 SE 14,990 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध झाली आहे. ही फोनच्या 4GB RAM + 64GB Storage व्हेरिएंटची प्राइस आहे. हा वनप्लस फोन Blue Oasis आणि Celestial Black कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: जुना स्टॉक संपवण्यासाठी OnePlus 10 Pro वर मोठी सूट; नव्या फ्लॅगशिपसाठी जागा बनवण्याची तयारी सुरु

OnePlus Nord N20 SE Specifications

वनप्लस नॉर्ड एन20 एसई स्मार्टफोन 20.1:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर लाँच झाला आहे जो 1612 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.56 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही इनसेल स्क्रीन आहे जी 60हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते तसेच 269पीपीआय आणि रियल आरजीबी सारख्या फीचर्ससह येते. या फोनचे डायमेंशन 163.74×75.03×7.99एमएम आणि वजन 187ग्राम आहे.

OnePlus Nord N20 SE अँड्रॉइड 12 आधारित ऑक्सीजनओएस 12.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर तसेच मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा वनप्लस मोबाइल फोन आयएमजी जीई8320 जीपीयूला सपोर्ट करतो. वनप्लस नॉर्ड एन20 एसई LPDDR4X RAM आणि eMMC5.1 Storage टेक्नॉलॉजीवर काम करतो.

फोटोग्राफीसाठी OnePlus Nord N20 SE मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सरसह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी वनप्लस नॉर्ड एन20 एसई स्मार्टफोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: सोप्या शब्दांत समजून घ्या 5G स्पेक्ट्रम बँड; 5G फोन विकत घेताना होणार नाही फसवणूक

OnePlus Nord N20 SE 4G Phone आहे जो ड्युअल सिम, ब्लूटूथ आणि वायफाय सह अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्सला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी वनप्लस नॉर्ड एन20 एसईमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला देखील सपोर्ट करतो. अशाप्रकारे बॅकअपसाठी OnePlus Nord N20 SE मध्ये 33W SUPERVOOC असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here