12जीबी रॅमसह Infinix GT 20 Pro एफसीसीवर लिस्ट, लवकर होऊ शकतो सादर

इंफिनिक्स आपल्या जीटी 10 सीरिजच्या अपग्रेडसाठी 20 आणण्याची तयारी करत आहे. यानुसार Infinix GT 20 Pro स्मार्टफोन लवकर बाजारात येण्याची शक्यता आहे. डिव्हाईसच्या लाँचची बातमी काही दिवसांपासून चर्चेमध्ये आहे. हा बेंचमार्किंग साईट गीकबेंच प्लॅटफॉर्मवर पहिलाच समोर आला आहे. तसेच, आता एफसीसी लिस्टिंगमध्ये दिसला आहे. याच्या प्रमुख स्पेसिफिकेशनची माहिती मिळाली आहे. चला, पुढे सर्टिफिकेशन सविस्तर जाणून घेऊया.

Infinix GT 20 Pro एफसीसी लिस्टिंग

  • फेडरल कम्युनिकेशंस कमिशन (FCC) सर्टिफिकेशन वेबसाईटवर Infinix GT 20 Pro X6871 मॉडेल नंबरसह दिसला आहे.
  • लिस्टिंगनुसार स्मार्टफोनमध्ये 45W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असेल. टेस्टिंगसाठी मॉडेल नंबर U450XSB असणाऱ्या चार्जरचा उपयोग केला गेला होता. हा चार्जर 15W (5V/3A) आणि 45W (11V/4.1A) वर पावर आऊटपुट प्रदान करतो.
  • फोनमध्ये फास्ट स्पीड असलेल्या परफॉरमेंससाठी 12GBरॅम +256GB इंटरनल स्टोरेज मिळण्याची चर्चा आहे.
  • या प्लॅटफॉर्मवर एक फोटो पण पाहायला मिळाली आहे ज्यात फोनचे पूर्व मॉडेल प्रमाणे ट्रिपल-रिअर कॅमेरा सेटअप आहे.
  • एफसीसीवर फोनचे डायमेंशन 164×74.5×7.6 मिमी सांगण्यात आले आहेत.
  • स्मार्टफोनमध्ये 5G आणि वाय-फाय 6 802.11 a/n/ac/ax कनेक्टिव्हिटीला सपोर्ट पण दिसला आहे.

Infinix GT 20 Pro चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

  • प्रोसेसर: गीकबेंच लिस्टिंगनुसार Infinix GT 20 Pro मध्ये MediaTek Dimensity 8200 प्रोसेसर लावला जाऊ शकतो.
  • बॅटरी: मोबाईलला चालवण्यासाठी यात मोठी 5000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. याला फास्ट चार्ज करण्यासाठी 45 वॉट चार्जिंगला सपोर्ट मिळू शकतो.
  • स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत डिव्हाईस 12GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंट व्यतिरिक्त 8GB रॅम + 256GB स्टोरेजसह येऊ शकतो.

शेवटी तुम्हाला सांगतो की, Infinix GT 20 Pro ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (BIS) वर पण दिसला होता. ज्यामुळे याचे भारतातील लाँचचा संकेत आहे. परंतु अजून अधिकृत घोषणा झालेली नाही.परंतु असे वाटत आहे की काही दिवसांमध्ये ब्रँडकडून फोनला टिझ केले जाऊ शकते.

Infinix GT 10 Pro Video

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here