Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ चा चार्जिंग स्पीड वाढू शकतो; लिस्टिंगमधून खुलासा

Highlights

  • Realme 11 Pro+ 5G स्मार्टफोन IMEI डेटाबेसवर RMX3471 मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे.
  • Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ स्मार्टफोन्स चीनच्या 3C सर्टिफिकेशन साईटवर देखील दिसले आहेत.
  • या लिस्टिंगमधून स्मार्टफोन्समधील अनुक्रमे 67W आणि 100W फास्ट चार्जिंगचा खुलासा झाला आहे.

Realme 11 सीरिजची जोरदार तयारी सुरु असल्याचं चित्र आहे, कारण Realme 10 सीरिजचे मॉडेल्स विविध मार्केट्समध्ये लाँच करून झाले आहेत. टिपस्टर मुकुल शर्मानं Realme 11 Pro+ 5G स्मार्टफोन IMEI डेटाबेसवर पहिला आहे, तर Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ स्मार्टफोन्स चीनच्या 3सी सर्टिफिकेशन प्लॅटफॉर्मवर दिसले आहेत. यामुळे Realme 11 सीरिजमध्ये अनेक मॉडेल्स असतील हे स्पष्ट झालं आहे आणि यातील फास्ट चार्जिंग स्पीडची देखील माहिती मिळाली आहे, जो Realme 10 सीरिज पेक्षा कितीतरी जास्त आहे.

रियलमी 11 प्रो सीरिज ऑनलाइन दिसली

IMEI लिस्टिंगमधून Realme 11 Pro+ स्मार्टफोनची कोणतीही माहिती मिळाली नाही, फक्त या फोनचा मॉडेल नंबर RMX3471 समोर आला आहे. दुसरीकडे चायनाच्या 3सी वेबसाइटवरून समजलं आहे की वॅनिला Realme 11 Pro चा मॉडेल नंबर RMX3770 असेल. या लिस्टिंगमधून समजलं आहे की या हँडसेटचा चार्जिंग स्पीड 67W असेल. जो Realme 10 Pro मधील 33W SuperVOOC चार्जिंगच्या दुप्पट आहे.

64MP Camera सह Vivo T2 5G भारतात दाखल; पाहा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

तर Realme 11 Pro+ 5G स्मार्टफोन RMX3740 मॉडेल नंबरसह चिनी सर्टिफिकेशन साईटवर दिसला आहे. चिनी आणि ग्लोबल व्हेरिएंट वेगवेगळे असल्यामुळे मॉडेल नंबर वेगवेगळे आहेत. Realme 11 Pro+ 5G मध्ये 100W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळेल. बाजारातील Realme 10 Pro+ मध्ये 67W फास्ट चार्जिंग मिळत आहे.

रियलमी 11 प्रो, रियलमी 11 प्रो + चे लीक स्पेसिफिकेशन्स

TENAA लिस्टिंगमधून समजलं आहे की Realme 11 Pro स्मार्टफोनमध्ये 4,780mAh ची बॅटरी मिळू शकते. तर Realme 11 Pro+ 5G मॉडेल 4,680mAh बॅटरीसह बाजारात येऊ शकतो. तसेच या फोन्समध्ये 6.7-इंचाचा कर्व फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले 120हर्ट्झ रिफ्रेश रेटसह मिळू शकतो. यातील चिपसेटचा खुलासा मात्र झाला नाही, परंतु प्रोसेसर 2.6GHz क्लॉक स्पीडसह येऊ शकतो. जोडीला 16GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळू शकते.

Realme 11 Pro आणि 11 Pro+ 5G मध्ये अँड्रॉइड 13 मिळण्याची शक्यता आहे. यातील वॅनिला प्रो मॉडेलमध्ये ड्युअल रियर कॅमेरा मिळू शकतो, ज्यात 100 किंवा 108MP चा मुख्य कॅमेरा आणि 2MP ची सेकंडरी लेन्स. तर 16MP चा फ्रंट कॅमेरा असू शकतो. तर Realme 11 Pro+ मध्ये कंपनी 200MP च्या मुख्य कॅमेऱ्यासह, 8MP चा अल्ट्रा वाइड आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळू शकतो. हा फोन देखील 16MP च्या फ्रंट कॅमेऱ्यासह येऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here