150W फास्ट चार्जिंग आणि 5000mAh बॅटरीसह Realme GT 2 Master Explorer Edition फोन येतोय

एकेकाळी फक्त बजेट आणि मिड रेंज स्मार्टफोन्समध्ये सक्रिय असलेली Realme सध्या फ्लॅगशिप आणि प्रिमीयम स्मार्टफोनमध्ये देखील सक्रिय झाली आहे. कंपनी आपल्या GT सीरिजमध्ये हाय एन्ड स्मार्टफोन सादर करत आहे. कंपनीनं यंदा लाँच केलेल्या Realme GT 2 Pro ला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. आता या सीरिजमध्ये Realme GT 2 Master Explorer Edition स्मार्टफोनची एंट्री होणार आहे. हा फोन क्वॉलकॉमच्या लेटेस्ट आणि पावरफुल Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह सादर करण्यात येईल.

Realme GT 2 Master Explorer Edition स्मार्टफोन सर्वप्रथम चीनमध्ये सादर करण्यात येईल. यासाठी 12 जुलैला एका इव्हेंटचे आयोजन करण्यात येईल. रियलमीचा पहिला स्मार्टफोन आहे जो क्वॉलकॉमच्या Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह सादर करण्यात येईल. लाँचपूर्वीच कंपनीनं या हँडसेटचे अनेक स्पेसिफिकेशन्स टीज केले आहेत. त्यानुसार हा स्मार्टफोन 120Hz रिफ्रेश रेट असलेल्या AMOLED डिस्प्लेसह सादर करण्यात येईल, जो आय केयर मोडला सपोर्ट करेल. तसेच आता Realme GT 2 Master Explorer Edition स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमधून आगामी रियलमी स्मार्टफोनच्या किंमत आणि स्टोरेज ऑप्शनची माहिती मिळाली आहे.

डिजाइन

Realme GT 2 Master Explorer Edition मध्ये चित्तवेधक डिजाइन देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन सोनेरी रंगाच्या बॅक पॅनलसह सादर करण्यात येईल. फ्रंटला सेल्फी कॅमेऱ्यासाठी सेंटर पंच होल कटआउट मिळेल. आगामी रियलमी स्मार्टफोनच्या डावीकडे वॉल्यूम रॉकर असेल. तर उजव्या पॅनलवर पावर बटन देण्यात येईल. या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि स्टीरियो स्पीकर मिळेल अशी अपेक्षा आहे. हे देखील वाचा: सरकार रेकॉर्ड करणार तुमचे सर्व कॉल्स, New Communication Rule उद्यापासून लागू! तुम्हाला आलाय का मेसेज?

Realme GT 2 Master Explorer Edition ची किंमत

Realme GT 2 Master Explorer Edition स्मार्टफोनची किंमत चीनमध्ये RMB 9,999 (सुमारे 1.18 लाख रुपये) पासून सुरु होईल. तसेच स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतात. बेस मॉडेलमध्ये 8GB रॅम व 128GB स्टोरेज मिळू शकते. तर अन्य दोन व्हेरिएंटमध्ये 8GB रॅम व 256GB स्टोरेज आणि 12GB रॅम व 256GB स्टोरेज मिळू शकते.

Realme GT 2 Master Explorer Edition चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

Realme GT 2 Master Explorer Edition स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले दिला जाईल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. त्याचबरोबर हा फोन क्वॉलकॉमच्या Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह बाजारात येईल. फोनमध्ये Android 12 आधारित Realme UI 3.0 कस्टम स्किन मिळेल. यात 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते. हे देखील वाचा: वनप्लसला झटका देण्याची तयारी पूर्ण; 64MP कॅमेरा असलेल्या Redmi 50i 5G च्या लाँचची तारीख समजली

आगामी Realme GT 2 Master Explorer Edition स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर असेल, जोडीला 50MP चा अल्ट्रा-वाईड-अँगल कॅमेरा आणि 2MP चा थर्ड सेन्सर मिळेल. फोनच्या फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात येईल. Realme GT 2 Master Explorer Edition स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 100W/150W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here