Realme 11 Pro सीरिजच्या भारतीय लाँचची माहिती लीक, लाँच ऑफर्ससह किंमतही समजली

Highlights

  • Realme 11 Pro सीरिज 8 ते 14 जून दरम्यान भारतात प्री ऑर्डरसाठी उपलब्ध होईल.
  • Realme 11 Pro 5G सीरिज प्री ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना Realme Watch 2 Pro मोफत मिळेल.
  • The Realme 11 Pro 5G will go on sale from June 17th in the global markets.

Realme 11 Pro सीरिज भारतात 8 जूनला सादर केली जाणार आहे. हे फोन आधीच चीनमध्ये आले आहेत, त्यामुळे त्यांच्या लूक आणि हार्डवेअरची माहिती उपलब्ध आहे. परंतु आता Realme 11 Pro सीरिजच्या भारतीय लाँच पूर्वीच लाँच ऑफर आणि प्री ऑर्डरची माहिती टिपस्टर सुधांशु अंभोरेनं दिली आहे. तसेच पोस्टरमधून देखील ह्या माहितीला दुजोरा दिला आहे.

दुसरीकडे NewzOnly वेबसाइटनं टिपस्टर पारस गुगलानीच्या हवाल्याने Realme 11 Pro 5G च्या रॅम, स्टोरेज ऑप्शन आणि इतर माहिती दिली आहे. तसेच टिपस्टरनं आगामी रियलमी स्मार्टफोन्सच्या जागतिक बाजारातील किंमतीची माहिती देखील दिली आहे.

Realme 11 Pro सीरिजची प्री ऑर्डर तारीख आणि ऑफर्स

  • Realme 11 Pro सीरिज 8 जूनला लाँच केली जाईल आणि त्याच दिवशी हे फोन्स प्री ऑर्डरसाठी उपलब्ध होतील.
  • लीक पोस्टरनुसार, डिवाइस 8 ते 14 जून दरम्यान प्री ऑर्डरसाठी उपलब्ध होईल.
  • डिवाइस 15 जूनपासून रियलमीच्या वेबसाइटसह फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
  • Realme 11 Pro 5G सीरिज प्री ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना Realme Watch 2 Pro मोफत दिला जाईल.
  • Watch 2 Pro कंपनीनं 2021 मध्ये लाँच केला आहे आणि सध्या ह्याची किंमत 4,499 रुपये आहे.
  • त्याचबरोबर कंपनी नो कॉस्ट ईएमआयचे ऑप्शन IDFC, Bajaj Finance, TVS Credit, Paytm, HDB, IDFC Bank, Home Credit, bonushub, benow आणि ezetap च्या माध्यमातून देईल तसेच डाउन पेमेंट 11 रुपये इतकं कमी असू शकतं.

Realme 11 Pro रॅम आणि स्टोरेज

  • NewzOnly च्या रिपोर्टनुसार Realme 11 Pro 5G स्मार्टफोन जागतिक बाजारात दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये सादर केला जाईल. ह्यात 8GB RAM आणि 128GB/256GB स्टोरेजचा समावेश असेल.
  • Realme 11 Pro स्मार्टफोनचा 8GB + 128GB मॉडेल 310 युरो (सुमारे 27,400 रुपये) मध्ये सादर केला जाऊ शकतो. परंतु 256GB व्हेरिएंटची किंमत मात्र अजून समजली नाही.
  • Realme 11 Pro बाजारात Astral Black आणि Sunrise Beige कलरमध्ये उपलब्ध होईल.
  • Realme 11 Pro 5G जागतिक बाजारात 17 जूनपासून उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here