फक्त 99 रुपयांमध्ये थिएटरमध्ये बघा ‘वाळवी’ आणि वेड सारखे चित्रपट, ‘या’ दिवशी मिळेल ही ऑफर

Highlights

  • PVR मध्ये 20 जानेवारीला Rs 99 मध्ये कोणताही चित्रपट बघता येईल.
  • ही ऑफर निवडक शहर आणि राज्यांसाठी PVR नं आणली आहे.
  • या ऑफरचा लाभ काही केंद्र शासित प्रदेशांमध्ये घेता येणार नाही.

जर तुम्ही देखील चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहणं पसंत करत असाल तर तुमच्यासाठी PVR Cinemas नं एक शानदार ऑफर सादर केली आहे. Cinema Lover’s Day सेलिब्रेट करण्यासाठी PVR 20 जानेवारीला फक्त 99 रुपयांमध्ये कोणताही चित्रपट बघण्याची संधी देत आहे. त्यामुळे प्रेक्षक वाळवी, वेड सारख्या मराठी चित्रपट स्वस्तात शकतात. तसेच Avatar: The Way of Water, Varisu, Kuttey आणि इतर चित्रपट फक्त 99 रुपयांमध्ये बघण्याची देखील संधी आहे. ही ऑफर शोची वेळ आणि तिकिटांची उपलब्धता या बाबींवर अवलंबून आहे. चला पाहूया तुम्ही या ऑफरचा लाभ कशाप्रकारे घेऊ शकता.

PVR offer: कोणतंही तिकीट Rs 99

20 जानेवारीला 99 रुपयांमध्ये कोणताही चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षकांना पीवीआर वेबसाइटच्या माध्यमातून तिकीट बुक करावी लागेल. लक्षात असू दे रिक्लायनर, आयमॅक्स, 4डीएक्स आणि यासारख्या अन्य प्रीमियम कॅटेगरीच्या सीट्सवर ही ऑफर वैध असणार नाही. PVR मध्ये 99 रुपयांमध्ये चित्रपट बघण्यासाठी तुम्ही या लिंकवर जाऊन तिकीट बुक करू शकता. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त नोकिया स्मार्टफोन लाँच; कमी किंमतीत शानदार स्पेक्ससह Nokia C12 ची एंट्री

मल्टीप्लेक्स सिनेमा चेन PVR Cinema नं काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया चॅनेलच्या माध्यमातून या ऑफरची घोषणा केली होती. पीवीआरनं म्हटलं आहे की प्रेक्षक 20 जानेवारीला फक्त 99 रुपयांमध्ये कोणताही चित्रपट पाहू शकतात. कंपनीनं लिहलं आहे की “आम्ही सिनेमा प्रेमी दिवसाच्या निमित्ताने चित्रपटांची जादू जादुई किंमतीत साजरी करत आहोत. तुम्ही 20 जानेवारीला पीवीआर मध्ये99 रुपयांमध्ये चित्रपट पाहू शकता. कोणताही चित्रपट पाहा, कोणताही शो पाहा, चला लवकर बुक करा तुमचं तिकीट.” हे देखील वाचा: चार्जींगविना 120km चालेल ही HOP Leo electric scooter; किंमत 1 लाखांपेक्षा कमी, सोबत 3 वर्षांची वॉरंटी

या राजांमध्ये मिळणारी नाही ही ऑफर

मल्टीप्लेक्स चेननुसार, 99 रुपयांची ऑफर फक्त निवडक राज्य आणि शहरांमध्येचे उपलब्ध होईल. आंध्र प्रदेश, तामिळनाडु, कर्नाटक आणि केरळमधील प्रेक्षकांना जीएसटीसह 100 रुपयांचं पेमेंट करावं लागेल. तर, तेलंगानातील प्रेक्षकांना 112 आणि जीएसटीसह तिकीट खरेदी करावं लागेल. कंपनीनं असा देखील खुलासा केला आहे की ही ऑफर पॉन्डेचेरीसह काही केंद्र शासित प्रदेशांमध्ये लागू होणार नाही. तसेच मॅनेजमेंट कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय ही ऑफर रद्द देखील करू शकतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here