15 हजार पेक्षा कमी असेल Realme 12x 5G Price! लाँचच्या आधी स्पेसिफिकेशन पण आले समोर

Realme 12x 5G 2 एप्रिलला भारतात लाँच होईल. या अपकमिंग रियलमी मोबाईलला कंपनी द्वारे टिझ केले जात आहे तसेच याचे फोटो व अनेक फिचर्स पण सांगण्यात आले आहे. तसेच ​आज रियलमी 12 एक्स 5 जी भारतातील लाँचच्या आधी याची किंमत रेंज व फुल स्पेसिफिकेशन पण समोर आले आहेत. हा रियलमी फोन 15 हजाराच्या बजेटमध्ये येईल.

Realme 12x 5G ची किंमत (लीक)

टिपस्टर सुधांशूने रियलमी 12एक्स 5 जी फोनच्या स्पेक्सची शीट शेअर केली आहे ज्यात फोनचे सर्व स्पेसिफिकेशन सांगितले आहेत. येथे Realme 12x 5G चा Redme 12, Vivo Y28 आणि Redmi 12C चे कंपॅरिजन करण्यात आले आहेत. या शीटमध्ये सांगण्यात आले आहे की रियलमी 12 एक्स 5 जी 8GB RAM + 128GB Storage वर लाँच होईल ज्याची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असणार आहे.

Realme 12x 5G चे स्पेसिफिकेशन (लीक)

  • 6.72″ FHD+ 120Hz Screen
  • MediaTek Dimensity 6100+
  • 8GB RAM + 128GB Storage
  • 8MP Selfie Camera
  • 50MP Dual Rear Camera
  • 45W 5,000mAh Battery

डिस्प्ले: रियलमी 12 एक्स 5 जी फोनला 6.72 इंचाच्या फुलएचडी+ स्क्रीनवर लाँच केले जाऊ शकते. ही पंच-होल स्टाईल असणारा डिस्प्ले असणार आहे, ज्यावर 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट तसेच 950 निट्स ब्राईटनेस मिळेल.

प्रोसेसर: Realme 12X अँड्रॉईड 14 आधारित रियलमी युआय 5.0 वर लाँच होईल. प्रोसेसिंगसाठी या मोबाईलमध्ये 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डिमेनसिटी 6100+ ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाईल जो 2.2 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो.

मेमरी: लीकनुसार हा रियलमी मोबाईल 8 जीबी रॅमवर भारतात लाँच होईल. स्मार्टफोनमध्ये 128 जीबी स्टोरेज दिले जाणार असल्याची चर्चा आहे ज्यासोबत 2 टीबी मायक्रोएसडी कार्डला सपोर्ट पण मिळेल.

कॅमेरा: फोटोग्राफीसाठी रियलमी 12एक्स मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा दिला जाईल ज्यात 50 मेगापिक्सल मेन सेन्सर असणार आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

बॅटरी: पावर बॅकअपसाठी Realme 12X 5G फोनमध्ये 5,000 एमएएच बॅटरी दिली जाईल. तसेच ही बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी स्मार्टफोनला 45 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह केला जाईल.

इतर फिचर्स: रियलमी 12 एक्स 5जी फोनची जाडी 7.69mm असेल, तसेच वजन 188g असणार आहे. या फोनमध्ये आयपी 54 रेटिंग, 3.5 एमएम जॅक आणि साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर सारखे फिचर्स पाहायला मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here