Poco F6 च्या लाँच पूर्वीच स्पेसिफिकेशन आले समोर, लवकर होऊ शकते लाँचिंग

पोको आपल्या F6 सीरिजवर काम करत आहे, यानुसार Poco F6 आणि Poco F6 Pro स्मार्टफोन बाजारात येण्याची शक्यता आहे. परंतु अजून प्रो मॉडेलची माहिती समोर आलेली नाही, परंतु एफ 6 मॉडेलला आम्ही पहिले पण एक्सक्लूसिव्हली कव्हर केले आहे. तसेच, आता एकदा परत समान्य पोको एफ6 के स्पेसिफिकेशनसह इतर लीकमध्ये पाहिले गेले आहे. हे पण बोलले जात आहे की मोबाईल एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये लाँच होऊ शकतो. चला, पुढे माहिती सविस्तर जाणून घेऊया.

Poco F6 चे स्पेसिफिकेशन (लीक)

Poco F6 च्या लाँच पूर्वीच अँड्रॉईड हेडलाइन्सने पोको F6 बाबत माहिती शेअर केली आहे.

डिस्प्ले: लीक रिपोर्टनुसार पोकोच्या नवीन मोबाईलमध्ये युजर्सना टीसीएल आणि Tianma द्वारे बनविलेला डिस्प्ले सादर केला जाऊ शकतो. परंतु या माहितीमध्ये स्क्रीनच्या आकाराची माहिती मिळालेली नाही, परंतु आमच्याकडे आलेल्या एक्सक्लूसिव्ह माहितीनुसार डिव्हाईसमध्ये 6.67 इंचाचा 1.5 के डिस्प्ले दिला जाऊ शकतो.

प्रोसेसर: Poco F6 फोनचा प्रोसेसर पाहता लीकनुसार हा SM8635 असलेला असेल ज्याचा अर्थ असा आहे की यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 एस जेन 3 चिपसेट सादर केला जाऊ शकतो. ही माहिती आमच्याद्वारे पहिली पण देण्यात आली होती. तसेच हा चिपसेट अलीकडेच लाँच केला गेलेला Xiaomi Civi 4 Pro मध्ये पण देण्यात आला आहे.

कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता पोको एफ6 स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा Sony IMX882 प्रायमरी कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची Sony IMX355 अल्ट्रा वाइड अँगल लेन्स मिळण्याची शक्यता आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ओमनी व्हिजन OV20B40 फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. या लीकनुसार असे वाटत आहे की डिव्हाईसमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा असेल, परंतु पूर्व मध्ये समोर आले होते की हा ट्रिपल कॅमेरा असलेला असू शकतो.

शेवटी तुम्हाला सांगतो की, नवीन Poco F6 मोबाईल Redmi Note 13 Turbo चा रिब्रँड व्हर्जन असल्याचे बोलले जात आहे. हा चीनमध्ये लवकर लाँच होण्याची शक्यता आहे. ज्यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की पोको फोन टर्बो आल्यानंतर एंट्री घेणार आहे. म्हणजे की याची लाँचिंग एप्रिल किंवा मे मध्ये केली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here