मात्र 7,999 रुपयांमध्ये पावरफुल स्मार्टफोन Lava O2 भारतात लाँच, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये

लावाने आपला स्वस्त स्मार्टफोन Lava O2 भारतीय बाजारात लाँच केला आहे. मोबाईल मात्र 7,999 रुपयांची लाँचच्या किंमतीमध्ये ग्राहकांना 8GB रॅम, 6.5 इंचाचा 90Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले, 50 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 5000mAh बॅटरी, यूनिसोक टी616 चिपसेट सारखे अनेक फिचर्स मिळत आहेत. तसेच हा मोबाईल ब्रँडच्या वेबसाईट, अ‍ॅमेझॉन आणि अन्य रिटेल आऊटलेट्सवर मिळेल. चला, पुढे डिव्हाईस ची किंमत आणि फुल स्पेसिफिकेशन जाणून घेऊया.

Lava O2 ची किंमत आणि उपलब्धता

  • Lava O2 ला मोबाईल ब्रँडने भारतात सिंगल स्टोरेज ऑप्शनमध्ये बाजारात आणला आहे.
  • फोनच्या 8GB रॅम +128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 8,499 रुपये ठेवण्यात आली आहे. तर लाँच ऑफर अंतर्गत हा मात्र 7,999 रुपयांमध्ये मिळेल.
  • डिव्हाईसचे कलर ऑप्शन पाहता याला इंपीरियल ग्रीन, मजिस्टिक पर्पल आणि रॉयल गोल्ड सारख्या तीन कलर ऑप्शनमध्ये एंट्री मिळाली आहे.
  • हा स्वस्त स्मार्टफोन कंपनीची वेबसाईट, अ‍ॅमेझॉन आणि इतर रिटेल आउटलेट्सवर 27 मार्चपासून उपलब्ध होईल.

Lava O2 चे स्पेसिफिकेशन

  • 6.5 इंचाचा डिस्प्ले
  • 90Hz रिफ्रेश रेट
  • 50MP AI रिअर कॅमेरा
  • 8MP सेल्फी कॅमेरा
  • यूनिसोक T616 एसओसी
  • 8 जीबी एक्सपांडेबल रॅम
  • 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज
  • 5,000mAh बॅटरी

डिस्प्ले

नवीन मोबाईल Lava O2 मध्ये युजर्सना 6.5 इंचाचा मोठा एचडी प्लस डिस्प्ले मिळतो, यावर 90Hz रिफ्रेश रेट, 720x 1600 पिक्सल रिजॉल्यूशन, 269 PPI पिक्सल डेंसिटी सादर करण्यात आली आहे. तसेच, स्क्रीनवर पंच होल डिझाईन पाहायला मिळते ज्यात सेल्फी कॅमेरा आहे.

प्रोसेसर

Lava O2 फोनचा प्रोसेसर पाहता ब्रँडने परफॉर्मन्ससाठी यात एंट्री लेव्हल यूनिसोक टी 616 चिपसेटचा वापर केला आहे. हा चिपसेट चांगला चालतो, ज्याचा अंतूतू स्कोर 280K सांगण्यात आला आहे.

स्टोरेज

डाटा स्टोर करण्यासाठी लावाच्या नवीन फोनमध्ये युजर्सना 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळते. त्याचबरोबर 8GB एक्सपांडेबल रॅम काला सपोर्ट आहे. म्हणजे की युजर्स 16GB पर्यंत रॅमचा वापर करू शकतात.

कॅमेरा

कॅमेरा फिचर्स पाहता हा स्मार्टफोन ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपसह ठेवला गेला आहे ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा AI कॅमेरा आहे. तसेच, सेल्फी घेणे, व्हिडिओ कॉल करणे, किंवा इतर कोणत्याही कामासाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

बॅटरी

बॅटरीच्या बाबतीत Lava O2 डिव्हाईस मोठी चालणारी 5000mAh बॅटरी देतो, ज्याला चार्ज करण्यासाठी ब्रँडने 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे.

इतर

इतर फिचर्स पाहता Lava O2 मध्ये फेस अनलॉक फिचर, साइट माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम 4G, वायफाय, ब्लूटूथ सारखे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत.

ओएस

ऑपरेटिंग सिस्टम पाहता नवीन मोबाईल Lava O2 अँड्रॉइड 13 वर चालतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here