Realme 5 Pro येण्याआधी 1,000 रुपयांनी स्वस्त झाला Realme 3 Pro, जाणून घ्या नवीन किंमत

Realme उद्या भारतात आपले नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनी देशात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत Realme 5 आणि 5 pro लॉन्च करेल. हे दोन्ही स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेऱ्यासह येतील जे ताकदवान स्पेसिफिकेशन्स सह बाजारात येतील. Realme फॅन्स कंपनीच्या या आगामी स्मार्टफोनची वाट बघत आहेत तर Realme 5 सीरीज भारतात येण्याआधी कंपनीने आपल्या आधीच्या Realme 3 pro स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे.

Realme ने ऑफलाईन प्लॅटफॉर्म वर Realme 3 pro च्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीने फोनच्या सर्व वेरिएंट्सची किंमत कमी केली आहे. Realme 3 Pro चा सर्वात छोटा 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता पण आता हा 13,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे फोनचा 15,999 रुपयांच्या 6जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज वेरिएंट तसेच 16,999 रुपयांच्या 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत थेट 1,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. प्राइज कट नंतर हे दोन्ही वेरिएंट्स क्रमश: 14,999 रुपये आणि 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येतील.

स्पेसिफिकेशन्स

Realme 3 Pro पाहता हा फोन 19:9 आसपेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्टेड 6.3-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. Realme 3 Pro एंडरॉयड 9 पाई वर सादर केला आहे जो कलरओएस 6.0 आधारित आहे. हा फोन क्वालकॉमच्या 10 नॅनोमीटर फॅब्रिकेशन वाल्या स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालतो आणि यात 2.2 गीगाहट्र्जचा ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. सोबतच एड्रीनो 616जीपीयू आहे.

Realme 3 Pro मध्ये 25-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे जो एआई ब्यूटी फिल्टर्स सह येतो. तसेच बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा आहे ज्यात एक सेंसर 16-मेगापिक्सलचा आहे तर दुसरा 5-मेगापिक्सलचा आहे. हा कॅमेरा सेटअप बोका इफेक्ट सोबत सुपर स्लो मोशन वीडियो रेकॉर्डिंगला पण सपोर्ट करतो. तसेच कंपनीने हा पिक्सल बिनिंग फीचर सह दिला आहे मेन कॅमेरा 64एमपी पिक्सल रेजल्यूशन वर फोटो घेऊ शकतो.

डुअल सिम आणि 4जी वोएलटीई सपोर्ट सोबत Realme 3 Pro मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी Realme 3 Pro मध्ये 4,045एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here