17 मिनिटांत फुलचार्ज होणाऱ्या OnePlus 10R स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट; 12GB RAM आणि 50MP कॅमेरा

OnePlus 10R Discount

जगातील सर्वात वेगवान चार्जिंग स्पीड असलेला OnePlus 10R स्मार्टफोन एप्रिलमध्ये भारतात लाँच झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये 150W फास्ट चार्जिंग स्पीड मिळतो. तसेच फोनमध्ये MediaTek Dimensity 8100 प्रोसेसर आणि 120Hz AMOLED डिस्प्ले असे भन्नाट फीचर्स देखील मिळतात. आता वनप्लसचा हा स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनवरून स्वस्तात विकत घेता येईल. अ‍ॅमेझॉनवर सुरु होणाऱ्या Prime Day सेल दरम्यान वनप्लस 10 आर स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काउंट मिळणार आहे. OnePlus 10R स्मार्टफोनचे तिन्ही व्हेरिएंट डिस्काउंटसह विकत घेता येतील.

OnePlus 10R वरील ऑफर

OnePlus 10R स्मार्टफोनचा 8GB रॅम व 128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 38,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला होता. तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 42,999 रुपये आहे. 150W फास्ट चार्जिंग असलेल्या OnePlus 10R Endurance Edition मध्ये 12GB रॅम व 256GB स्टोरेज मिळते आणि याची किंमत भारतात 43,999 रुपये ठेवण्यात आली होती. हे देखील वाचा: शाओमीला टक्कर देण्यासाठी OnePlus सज्ज! येतोय 16GB रॅम असलेला सर्वात पहिला स्मार्टफोन

प्राईम डे सेल दरम्यान OnePlus 10R स्मार्टफोनची किंमत 34,999 रुपयांपासून सुरु होईल. या फोनवर अ‍ॅमेझॉन स्पेशल कुपन अंतगर्त 3000 रुपयांचा आणि 1000 रुपयांचा डिस्काउंट ICICI बँकेचं कार्ड वापरल्यावर मिळेल. हा डिस्काउंट तिन्ही व्हेरिएंटवर उपलब्ध होईल. त्यामुळे OnePlus 10R चे तिन्ही व्हेरिएंट अनुक्रमे 34,999 रुपये, 38,999 रुपये आणि 39,999 रुपयांमध्ये घरी आणता येतील.

OnePlus 10R चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus 10R स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz, टच रिस्पॉन्स रेट 720Hz, रिजोल्यूशन 2,412×1,080 पिक्सल आणि अस्पेक्ट रेश्यो 20:1:9 आहे. फोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट देण्यात आलं आहे. तसेच कंपनी या डिस्प्लेला Corning Gorilla Glass 5 लेयरची सुरक्षा देखील दिली आहे. या फ्लॅगशिप फोनमध्ये MediaTek Dimensity 8100 Max प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबतीला 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळते. हे देखील वाचा: घरीच मिळवा मोठ्या पडद्याची मजा! OnePlus नं भारतात लाँच केला 50 इंचाचा नवीन स्मार्ट टीव्ही

OnePlus 10R स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX766 सेन्सर आहे. जोडीला फोनमध्ये 8MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

OnePlus 10R स्मार्टफोनचे दोन बॅटरी मॉडेल भारतात सादर करण्यात आले आहेत. 4,500mAh ची बॅटरी असलेला व्हेरिएंट 150W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. तर दुसऱ्या मॉडेलमध्ये 5,000mAh ची बॅटरी मिळते, परंतु चार्जिंग स्पीड 80W देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G, ड्युअल-बँड Wi-Fi 6, Bluetooth 5.2, GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. वनप्लसचा हा सर्वात वेगवान चार्जिंग स्पीड असलेला स्मार्टफोन स्टिरिओ स्पिकर्ससह Dolby Atmosला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here