Redmi Note 10 सीरीजच्या सर्वात स्वस्त स्मार्टफोनचा सेल, यात आहे 6GB रॅम, 48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी

Redmi Note 10 Pro Max

Redmi India ने गेल्या महिन्यात आपली नवीन सीरीज Redmi Note 10 सादर केली होती. या सीरीजमध्ये Redmi Note 10, Note 10 Pro आणि Note 10 Pro Max आणले होते. या फोनबद्दल युजर्सची रुची बघता कंपनी हे फोन वारंवार सेलसाठी सादर करत आहे. जर तुम्ही Redmi Note 10 स्मार्टफोन मागील सेलमध्ये विकत घेण्यास हुकले असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे कि आता तुम्हाला हा फोन कधीही विकत घेता येईल. कंपनीने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून एक ट्वीट करून सांगितले होते कि आता रेडमी नोट 10 अमेझॉन इंडिया आणि mi.com वरून पण विकत घेता येईल. फोन या सीरीजचा सर्वात स्वस्त फोन आहे.

Redmi Note 10 Open Sale

यावेळी कंपनीने रेडमी नोट 10 ओपन विक्रीच्या माध्यमातून विकत घेण्याची संधी दिली आहे. म्हणजे तुम्ही हा फोन अमेझॉन इंडिया (Amazon India) आणि mi.com वर कधीही विकत घेऊ शकता. तसेच कंपनीने असे पण सांगितले आहे कि हा फोन युजर आता Mi Home आणि रिटेल स्टोर्सवरून पण विकत घेता येईल. हा फोन अ‍ॅक्वा ग्रीन, फ्रॉस्ट वाइट आणि शॅडो ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये येतो.

हे देखील वाचा : iQOO Neo5 स्मार्टफोन दमदार स्पेसिफिकेशन्ससह भारतात होईल लॉन्च, जाणून घ्या वैशिष्ट्ये

Redmi Note 10 चे स्पेसिफिकेशन

शाओमी रेडमी नोट 10 स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला गेला आहे जो 2400 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.43 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनचा डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे जो 60हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. त्याचबरोबर हा फोन 1100निट्स ब्राइटनेसला पण सपोर्ट करतो.

Redmi Note 10 अँड्रॉइड 11 वर लॉन्च केला गेला आहे जो मीयुआय 12 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 11एनएम टेक्नॉलॉजीवर बनलेला क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 678 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 612 जीपीयूला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी रेडमी नोट 10 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX582 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 5 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. फोनच्या फ्रंट पॅनलवर 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Xiaomi Redmi Note 10 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी जिथे फोनच्या साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी रेडमी नोट 10 मध्ये 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

Redmi Note 10 Price

Redmi Note 10 ची किंमत 11,999 रुपयांपासून सुरु होत आहे. या किंमतीत 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज असलेला वेरिएंट विकत घेता येईल. तर 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे.

शाओमी रेडमी नोट 10 व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here