OPPO Reno5 Z ने केली धमाकेदार एंट्री, यात आहे 48MP कॅमेरा, 8GB रॅम आणि खूप काही

ओपो अनेक दिवसांपासून आपल्या पॉप्युलर स्मार्टफोन सीरीज Oppo Reno 5 मध्ये नवनवीन मोबाईल्सला सादर करत आहे. गेल्याच महिन्यात कंपनीने OPPO Reno 5 Lite सादर केला होता. आता कंपनीने या सीरीजमध्ये अजून एक नवीन 5G फोन OPPO Reno5 Z 5G सादर केला आहे. हा फोन OPPO द्वारे गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये सादर केलेल्या OPPO Reno 4 Z स्मार्टफोनचा अपग्रेडेड वर्जन असल्याचे बोलले जात आहे. कंपनीने OPPO Reno5 Z स्मार्टफोन (मॉडेल नंबर CPH2211) सिंगापूरमध्ये लॉन्च केला आहे. तसेच डिवाइस यूएईच्या ओपो वेबसाइटवर पण लिस्ट आहे. डिजाइन आणि फीचर्सच्या बाबतीत फोन ओपो F19 प्रो + 5G सारखा दिसत आहे जो गेल्या महिन्यात भारतात लॉन्च झाला होता.

डिजाइन

OPPO F19 Pro आणि OPPO Reno5 Z चा लुक जवळपास एकसारखा आहे. रेनो5 झेड स्मार्टफोन बेजल लेस पंच-होल डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे ज्याच्या वर डाव्या कोपऱ्यात सेल्फी कॅमेरा होल आहे. तसेच फोनमध्ये चौकोनी क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट आहेत ज्यात तीन सेंसर वर्टिकल शेपमध्ये तर एक सेंसर बाजूला आहे. फोनचे डायमेंशन 16.01×7.34×0.78 आणि वजन 173 ग्राम आहे.

हे देखील वाचा : Vivo X70 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, Snapdragon 888 चिपसेट आणि Zeiss optics सह होईल लॉन्च

OPPO Reno5 Z चे स्पेसिफिकेशन्स

फोन 20:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला गेला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या एफएचडी+ एमोलेड पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. तसेच फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट 3.0 सेंसर टेक्नॉलॉजीसह येतो जो 60हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.8% आहे तसेच ओपो फोनला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा मिळाली आहे.

OPPO ने हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर लॉन्च केला आहे जो कलरओएस 11.1 सह काम करतो. तसेच प्रोसेसिंगसाठी मीडियाटेकचा डायमनसिटी 800यू चिपसेट आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 8GB LPDDR4x रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 4,310एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हि बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी 30W VOOC Flash Charge 4.0 टेक्नॉलॉजी आहे. फोनमध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत.

हे देखील वाचा : 48MP रियर कॅमेरा आणि 5G च्या पावरसह OPPO A74 झाला लॉन्च, जाणून घ्या याची वैशिष्ट्ये

OPPO Reno5 Z चा कॅमेरा

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे क्वॉड कॅमेरा आहे. या कॅमेरा मॉड्यूलमध्ये एफ/1.7 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे ज्यासोबत एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा पोर्ट्रेट लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेली एक 2 मेगापिक्सलची मोनो लेंस आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

OPPO Reno5 Z ची किंमत

OPPO Reno5 Z सिंगापूरमध्ये SGD 529 (29,000 रुपये) सह आला आहे. फोन दोन रंगात सादर केला गेला आहे, ज्यात फ्लुइड ब्लॅक आणि कॉस्मो ब्लूचा समावेश आहे. हा ई-कॉमर्स साईट लाजाडा आणि शॉपीच्या माध्यमातून खरेदीसाठी उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here