6,000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह लॉन्च झाला स्वस्त असलेला Realme C15 Qualcomm Edition

Realme C15

Realme ने आज भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत एक नवीन स्मार्टफोन Realme C15 Qualcomm Edition नावाने मार्केट मध्ये आणला आहे. नावावरून समजले असेल कि हा फोन ऑगस्ट मध्ये लॉन्च झालेल्या Realme C15 स्मार्टफोनचा दुसरा वर्जन आहे. आधी आलेल्या रियलमी सी15 मीडियाटेकच्या हीलियो जी35 चिपसेट वर लॉन्च केला गेला होता. तर नवीन रियलमी सी15 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेट सह बाजारात आला आहे. या नवीन फोन नंतर Realme च्या पोर्टफोलियो मध्ये अजून एक 6,000एमएएच बॅटरी असलेला स्मार्टफोन जोडला गेला आहे.

रियलमी सी15 क्वॉलकॉम एडिशन लुक, डिजाईन व स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत बऱ्याच अंशी आधीच्या रियलमी सी15 सारखा आहे. हा नवीन मॉडेल दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे ज्यात 3 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम सह 64 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. किंमत पाहता फोनचा 3 जीबी + 32 जीबी वेरिएंट 9,999 तर 4 जीबी + 64 जीबी वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो आज पासून Power Blue आणि Power Silver कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Realme C15 Qualcomm Edition

नवीन रियलमी एडिशन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्टेड आहे जी 480निट्स मॅक्सिमम ब्राइटनेस आणि 600निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करते. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 88.7 टक्के आहे.

Realme C15 Qualcomm Edition फोटोग्राफीसाठी क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन एफ/2.25 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रावाइड सेंसर, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या रेट्रो लेंस आणि एक 2 मेगापिक्सलच्या ब्लॅक अँड वाइट सेंसरला सपोर्ट करतो. त्याचबरोबर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी रियलमी सी15 मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : 5,000mAh बॅटरी आणि 5 कॅमेरा असलेला स्वस्त Realme C17 दिवाळी नंतर होईल भारतात लॉन्च

Realme C15 अँड्रॉइड 10 वर सादर झाला आहे जो रियलमी वन यूआई वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वर चालणारा आक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 610 जीपीयूला सपोर्ट करतो. हा फोन डुअल सिम, 4जी वोएलटीई सोबतच 3.5एमएम जॅक व बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो जी रिवर्स चार्जिंग फीचर सह येते.

आधीच्या रियलमी सी15 बद्दल बोलायचे झाले तर या फोनचा 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपये तर फोन 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सणासुदीच्या निम्मिताने कंपनी Realme C15 Qualcomm Edition चा 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,499 रुपये तर फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 10,499 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here