Realme बद्दल अलीकडेच हि बातमी समोर आली होती कि कंपनी Realme C15 Qualcomm Edition सह भारतीय बाजारात घेऊन येणार आहे. कंपनीने फोनची कोणतीही माहिती दिली नाही. याआधी रियलमी सी15 स्मार्टफोन कंपनी द्वारे मीडियाटेकच्या हीलियो जी35 चिपसेट वर लॉन्च केला गेला होता. आता टिप्सटर मुकुल शर्माने माहिती दिली आहे कि कंपनी हा नवीन मॉडेल Realme C15s नावाने दोन किंवा तीन दिवसांत लॉन्च करणार आहे.
पण अजूनही स्पष्ट झाले नाही कि फोन कोणत्या क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर सह सादर केला जाईल. याआधी समोर आलेल्या लीकनुसार नवीन Realme C15s भारतीय मार्केट मध्ये दोन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल, ज्यात 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजचा समावेश असेल. तसेच हा फोन Power Blue आणि Power Silver कलर मध्ये विकत घेता येईल.
हे देखील वाचा :5,000mAh बॅटरी आणि 5 कॅमेरा असलेला स्वस्त Realme C17 दिवाळी नंतर होईल भारतात लॉन्च
Realme C15
रियलमी सी15 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 6.5 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 10 वर सादर झाला आहे जो रियलमी वन यूआई वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी Realme C15 स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. हा फोन 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रावाइड सेंसर, 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेंसर आणि एक ब्लॅक अँड वाइट सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी रियलमी सी15 मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
हे देखील वाचा : 48MP कॅमेरा आणि शानदार प्रोसेसर सह Realme Q2 आणि Q2 Pro झाले लॉन्च, जाणून घ्या किंमत
Realme C15 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. वाय-फाई, ब्लूटूथ, जीपीएस आणि 3.5एमएम जॅक व बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोन के बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा डिवायस फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो जी रिवर्स चार्जिंग फीचर सह येते.
रियलमी सी15 64जीबी व्हिडीओ















