Realme आपल्या C-सीरीजमध्ये बजेट स्मार्टफोन सादर करत असते. कंपनीनं भारतात देखील आतापर्यंत अनेक स्मार्टफोन सी सीरिजचे स्मार्टफोन सादर केले आहेत. आता बातमी आहे आली की कंपनी या बजेट सेगमेंट सीरीजमध्ये अजून एक नवीन Relame Smartphone सादर करण्याची योजना बनवत आहे. कंपनीद्वारे सादर करण्यात येणारा फोन Relame C33 नावानं सादर केला जाईल. परंतु अजूनपर्यंत याची अधिकृत माहिती समोर आली नाही. मीडिया रिपोर्टनुसार हा आगामी रियलमी स्मार्टफोन ऑगस्ट 2022 मध्ये भारतात पदार्पण करेल. तसेच काही लीक्समध्ये या आगामी स्मार्टफोन महत्वाची माहिती समोर आली आहे. चला यावर एक नजर टाकू.
Realme C33 इंडिया लाँच!
भारतातील प्रसिद्ध टिप्सटर सुधांशु अंभोरेनं या आगामी फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. सुधांशुनं आपल्या ट्विट मध्ये रियलमी C33 बाबत सांगितलं आहे की फोन तीन स्टोरेज ऑप्शनसह लाँच केला जाईल. चला जाणून घेऊया आगामी Realme C33 संबंधित लीकमधून समोर आलेली माहिती.
Realme C33 Storage & Color Options for India:
-Sandy Gold, Aqua Blue & Night Sea
-3GB+32GB, 4GB+64GB & 4GB+128GB#realmeC33 #realme https://t.co/X3CtOZuHlc— Sudhanshu Ambhore (@Sudhanshu1414) August 7, 2022
Realme C33 चे लीक स्पेसिफिकेशन्स
Appuals च्या रिपोर्टनुसार भारतात Realme C33 स्मार्टफोन 4GB पर्यंत रॅमसह लाँच केला जाईल. तसेच डिवाइसच्या सर्वात छोट्या मॉडेलमध्ये 32GB इंटरनल स्टोरेजसह 3GB रॅम मिळू शकतो. याव्यतिरिक्त फोन 4GB रॅमच्या दोन ऑप्शनमध्ये सादर केला जाईल. यातील छोट्या मॉडेलमध्ये 4GB रॅमसह 64GB देण्यात येईल. तर 4GB रॅमसह 128GB स्टोरेज असलेला अजून व्हेरिएंट देखील ग्राहकांच्या भेटीला येईल.
डिवाइसमध्ये एक यूनिसोक प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तसेच , Realme चा हा अपकमिंग फोन 10W चार्जिंगला सपोर्टसह सादर करण्यात येईल. फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी असण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्स नुसार फोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. या फोनचा मुख्य कॅमेरा 13MP चा सेन्सर असेल. जोडीला डेप्थ आणि मॅक्रो सेन्सर देण्यात येईल. तसेच फोन आउट ऑफ द बॉक्स Android 11 वर आधारित Realme UI चालेल.
Realme C33 ची भारतातील संभाव्य किंमत
लीक रिपोर्ट्सनुसार Realme C33 चा बेस मॉडेल म्हणजे 3GB रॅम असलेला मॉडेल भारतात 9,500 रुपये ते 10,500 रुपयांदरम्यान सादर केला जाऊ शकतो. तसेच Realme स्मार्टफोन 3 कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाऊ शकतो, ज्यात Sandy Gold, Aqua Blue आणि Night Sea समावेश आहे. अचूक अशी लाँच डेट समोर आली नाही तसेच हा फोन कुठे खरेदीसाठी उपलब्ध होईल हे देखील समजले नाही. परंतु लवकरच ही माहिती देखील वाचकांपर्यंत पोहोचवली जाईल.