Nothing Phone (3) लाँचची टाईमलाईन आली समोर, जाणून घ्या कधी लाँच होईल यूनिक डिझाईन असलेला हा नवीन फोन

91 मोबाईलने काही दिवसांपूर्वी Nothing Phone (3) बद्दल माहिती दिली होती. आम्हाला एका सोर्सकडून समझले आहे की फोन Qualcomm Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसरवर लाँच केला जाईल. तसेच, अलीकडेच आलेल्या एका रिपोर्टमध्ये मॉडेल नंबर A015 सह Tetris कोडनेम असणाऱ्या एका नवीन नथिंग स्मार्टफोनची माहिती मिळाली आहे. बोलले जात आहे की हा फोन अगामी Phone (3) आहे. आता नवीन रिपोर्टमध्ये या फोनची लाँच टाईमलाईनची माहिती मिळाली आहे.

Nothing Phone (3) लाँचची टाईमलाईन लीक

अँड्रॉईड हेडलाइंसच्या रिपोर्टनुसार, Nothing Phone (3) बाजारात 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत जुलैमध्ये लाँच केला जाऊ शकतो. तसेच, रिपोर्टमध्ये कोणत्याही सोर्सबाबत कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे या प्रक्षेपण टाईमलाईनच्या अचूकतेबद्दल काहीही बोलणे चुकीचे ठरेल.

Nothing Phone (3) किंमत संभावित

आम्हाला इंडस्ट्री सोर्सकडून काही दिवसांपूर्वी Nothing Phone (3) च्या किंमतीबाबत बाबत माहिती मिळाली होती. आमच्या सोर्सने सांगितले होते की या फोनची किंमत 40 ते 45 हजार रुपयांच्या आसपास असू शकते. कंपनीचा प्लॅन सध्या प्रीमियम सेगमेंटमध्ये जाण्याचा नाही, आणि 20 हजार ते 40 हजार रुपयांच्या बजेटमध्ये आपल्या युजर बेस बनविणार आहे. तसेच Nothing अजून हार्ह अँड चिपसेटकडे पाहत नाही.

प्रोसेसरचे वैशिष्ट्ये पाहता यात ऑन-डिव्हाईस फोटो जेनरेशन सारख्या फंक्शनसाठी क्वॉलकॉम AI इंजिन पण आहे. तसेच, प्रोसेसर व्यतिरिक्त बॅटरी लाईफ आणि फास्ट चार्जिंग सारख्या फिचरमध्ये पण सुधारण्याची आशा आहे. लाँचजवळ आल्यावर फोनशी संबंधित जास्त माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

तसेच वनप्लसपासून वेगळे झाल्यानंतर Carl Pei ने Nothing ची सुरुवात केली होती. सर्वप्रथम त्यांनी Nothing Phone 1 ला आणले, त्यानंतर Nothing Phone 2 आणि आता Nothing Phone 2a ला सादर केले आहे. परंतु सुरुवातीच्या दोन्ही मॉडेलला कंपनीने क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह सादर केले होते, परंतु तिसरा आणि सर्वात स्वस्त फोन Nothing Phone 2a मध्ये आम्हाला मीडियाटेक डायमेंसिटीचा प्रोसेसर पाहायला मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here