Vivo Y200i 5G च्या लाँचची तारीख झाली कंफर्म, पाहा टिझर आणि स्पेसिफिकेशन

विवो चीनमध्ये आपल्या वाय-200 सीरिजचा विस्तार करणार आहे. यानुसार Vivo Y200i 5G मॉडेल 20 एप्रिलला लाँच केले जाईल. ब्रँडने याचा टिझर शेअर करत माहिती शेअर केली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी डिव्हाईसला चीनच्या टेलीकॉम वेबसाईटवर डिझाईन, स्पेसिफिकेशन आणि किंमतीसह स्पॉट केला गेले होते. तसेच, आता याची अधिकृत माहिती आली आहे. चला, पुढे जाणून घेऊया की नवीन फोन कसा असणार आहे.

Vivo Y200i 5G टिझर आणि लाँचची तारीख

 • तुम्ही या फोनच्या टिझरमध्ये पाहू शकता की कंपनीने डिव्हाईसला 20 एप्रिल म्हणजे काल लाँच करण्याची घोषणा केली आहे.
 • Vivo Y200i 5G ला पोस्टर फोटोमध्ये ब्लू, ब्लॅक आणि पांढऱ्या या तीन कलर ऑप्शनमध्ये दाखविण्यात आले आहे.
 • फोनच्या बॅक पॅनलवर एक मोठा सर्कुलर कॅमेरा माड्यूल पाहायला मिळतो, ज्यात ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश आहे.
 • फोनमध्ये उजव्या साईडवर पावर आणि वॉल्यूम बटन पाहायला मिळते, यात साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असण्याची शक्यता आहे.
 • हे पण सांगण्यात आले आहे की मोबाईल येत्या 27 एप्रिलला चीनमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

Vivo Y200i 5G ची किंमत (संभाव्य)

 • चीनच्या टेलीकॉम लिस्टिंगनुसार Vivo Y200i तीन स्टोरेज मध्ये लाँच केला जाऊ शकतो.
 • बेस मॉडेल 8GB रॅम+256GB स्टोरेजची किंमत CNY 1,799 जवळपास 21,200 रुपये असू शकते.
 • मिड ऑप्शन 12GB रॅम+256GB स्टोरेज CNY 1,899 जवळपास 22,300 रुपयांना असल्याचे बोलले जात आहे.
 • टॉप व्हेरिएंट 12GB रॅम+512GB स्टोरेज CNY 1,999 म्हणजे भारतीय किंमतीसार 23,500 रुपयांचा असण्याची शक्यता आहे.

Vivo Y200i 5G चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

 • डिस्प्ले: Vivo Y200i 5G मध्ये पंच-होल डिझाईनसह 6.72-इंचाचा IPS LCD डिस्प्ले मिळू शकतो. हा फुल एचडी + रिजॉल्यूशन प्रदान करू शकतो.
 • प्रोसेसर: डिव्हाईसमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 प्रोसेसर लावला जाऊ शकतो.
 • कॅमेरा: फोटोग्राफीसाठी यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. तर बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा असल्याची चर्चा आहे.
 • बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत Vivo Y200i 44W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 6,000mAh ची मोठी बॅटरीसह असू शकते.
 • वजन आणि डायमेंशन: फोन 7.99 मिमी आणि 199 ग्रॅमचा असल्याचे सांगण्यात आले आहे.
 • इतर: मोबाईलमध्ये युजर्सना धूळ आणि पाण्यापासून वाचण्यासाठी IP64 रेटिंग, ड्युअल सिम 5 जी, वायफाय, ब्लूटूथ सारखे अनेक फिचर्स मिळतात.
 • ओएस: मोबाईल अँड्रॉईड 14 आधारित ओरिजिन ओएस 4 वर काम करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here