रिअलमीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि तुमचे बजेट थोडे कमी असेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण सध्या ॲमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग साईटवर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू आहे. ज्यामध्ये Realme GT 6T 5G हा 5,000 रुपयांनी स्वस्त विकला जात आहे. त्यावर डिस्काऊंटसोबत बँक आणि एक्सचेंज ऑफरही उपलब्ध आहेत. चला, पुढे मोबाईलवर मिळत असलेल्या आकर्षक सवलती आणि त्याच्या स्पेसिफिकेशन बद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.
Realme GT 6T 5G ची ऑफर्स आणि किंमत
- सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की Realme GT 6T 5G चार स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये येतो. त्याच्या सर्व मॉडेल्सवर कंपनीने 1,000 रुपयांचा फ्लॅट डिस्काऊंट आणि बेस मॉडेलवर 3,000 रुपये आणि इतर व्हेरिएंट्सवर 4,000 रुपयांचा कूपन डिस्काऊंट देण्यात येत आहे. त्यामुळे एकूण 5,000 रुपयांची सूट मिळत आहे.
- कूपन आणि फ्लॅट डिस्काऊंटसह बँक ऑफर देखील मिळत आहेत. हे एसबीआयच्या कार्ड वापरकर्त्यांना दिले जात आहे. यामध्ये सामान्य आणि ईएमआय व्यवहारांवर 1,250 रुपयांपर्यंत सूट मिळेल. यावरून फोनचे बेस मॉडेल 8 जीबी + 128 जीबी केवळ 25,748 रुपयांमध्ये खरेदी केले जाऊ शकते.
- त्याचप्रमाणे 8 जीबी + 256 जीबी, 12 जीबी + 256 जीबी आणि 12 जीबी + 512 जीबी मॉडेल्सवर 4,000 रुपये कूपन आणि बँक ऑफर लागू होईल.
- एक्सचेंज ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास तुम्ही तुमचा जुना डिव्हाईस विकून देखील फायदा मिळवू शकता. कारण ब्रँडकडून 26,000 रुपयांपर्यंतची सूट मिळेल. तथापि, ती अटी आणि शर्ती नुसार दिली जाईल.
ऑफर किंमत
- 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज = 25,748 रुपये
- 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज = 26,748 रुपये
- 12 जीबी रॅम+ 256 जीबी स्टोरेज = 29,748 रुपये
- 12 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज = ₹33,748 रुपये
लाँच किंमत
- 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज= 30,999 रुपये
- 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज = 32,999 रुपये
- 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज = 35,999 रुपये
- 12 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज = 39,999 रुपये
Realme GT 6T चे स्पेसिफिकेशन
- डिस्प्ले: Realme GT 6T मध्ये 6.78 इंचाचा 1.5K डिस्प्ले मिळत आहे.ही 8T एलटीपीओ ॲमोलेड स्क्रीन आहे ज्यावर 120 हर्ट्स रिफ्रेश रेट, 6000 निट्स पीक ब्राईटनेस आणि 2160 हर्ट्स पीडब्लूएम डिमिंग सपोर्ट दिला गेला आहे. यासोबतच ही स्क्रीन 3D गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 ने संरक्षित आहे.
- प्रोसेसर: Realme GT 6T 5G फोन अँड्राईड 14 वर लाँच केला गेला आहे जो रिअलमी यूआय 5.0 सह येत आहे. यात प्रोसेसिंगसाठी उत्कृष्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7+ जेन 3 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे.
- कॅमेरा: फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील पॅनलवर एफ/1.88 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सेलचा ओआयएस सोनी एलवायटी 600 सेन्सर आणि एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सेलची सोनी आयएमएक्स355 वाईड अँगल लेन्स उपलब्ध आहे. तर, सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेलची लेन्स आहे.
- बॅटरी: पॉवर बॅकअपसाठी Realme GT 6T 5G मध्ये 5, 500एमएएच ची मोठी बॅटरी दिली गेली आहे. त्याला लवकर चार्ज करण्यासाठी 120 वॉट फास्ट चार्जिंग मिळत आहे.
- इतर: Realme GT 6T स्मार्टफोन 9 5G बँड्सला सपोर्ट करतो. यात वायफाय 6, ब्लूटूथ 5.4, IP65 रेटिंग सारखे अनेक फिचर्स आहेत.














