अधिकृतपणे समोर आले Redmi Note 12 Pro 4G चे स्पेसिफिकेशन्स; मिळेल 108MP चा कॅमेरा

Highlights

  • शाओमी इंडोनेशियानं Redmi Note 12 Pro 4G चे स्पेसिफिकेशन्स शेअर केले आहेत.
  • हा सीरिजमधील पाचवा फोन असेल.
  • यात स्नॅपड्रॅगन 732जी चिपसेट देण्यात येईल.

शाओमी इंडोनेशियानं अधिकृतपणे आगामी Redmi Note 12 Pro 4G फोनचे महत्वाचे स्पेसिफिकेशन्स सांगितले आहेत. हा या सीरिजमधील पाचवा फोन असेल, याआधी कंपनीनं रेडमी नोट 12 सीरिजमध्ये Note 12 4G, Note 12 5G, Note 12 Pro 5G आणि Note 12 Pro+ 5G असे मॉडेल विविध बाजारांत सादर केले आहेत. हा नवीन स्मार्टफोन जरी नोट 12 सीरिजमध्ये येत असाल तर याचे स्पेसिफिकेशन्स काही प्रमाणात Redmi Note 10 Pro सारखे आहेत, जो मार्च 2021 मध्ये आला होता. लवकरच Redmi Note 12 Pro 4G स्मार्टफोन 108MP कॅमेरा, 120Hz अ‍ॅमोलेड डिस्प्ले स्नॅपड्रॅगन 732जी चिपसेटसह इंडोनेशियन बाजारात खरेदीसाठी उपलब्ध होईल.

रेडमी नोट 12 प्रो 4जी चे स्पेसिफिकेशन्स

शाओमी इंडोनेशियानं दिलेल्या माहितीनुसार, Redmi Note 12 Pro 4G फोनमध्ये 6.67 इंचाचा मोठा अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाईल, ज्यात मध्यभागी पंच होल मिळेल. ही स्क्रीन 1080 x 2400 पिक्सलसह फुलएचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करेल. तसेच यात रेडमी नोट 12 सीरिजच्या इतर मॉडेल्सप्रमाणे 120Hz रिफ्रेश रेट मिळेल. हे देखील वाचा: लो बजेटमध्ये लाॅन्च झाला Vivo Y02A; स्टाईलिश लुकसह मिळेल 5,000mAh Battery

स्नॅपड्रॅगन 732जी चिपसेटची पावर आगामी रेडमी नोट 12 प्रो 4जी मध्ये देण्यात आली आहे. त्याचबरोबर कंपनीनं 8जीबी रॅम आणि 256जीबी स्टोरेज देखील दिली आहे. ही स्टोरेज कमी पडल्यास मायक्रोएसडी कार्ड स्लॉटची सोय देखील करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 12 ओएसवर आधारित मीयुआय 13 वर चालेल.

रेडमी नोट 12 प्रो च्या फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. तर फोनच्या मागे असलेल्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये 108-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे, जोडीला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. हा फोन 4के व्हिडीओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो.

आगामी रेडमी नोट 12 प्रो फोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी मिळते जी 67वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी यात ड्युअल सिम, 4G VoLTE, Wi-Fi 802.11ac, Bluetooth 5.1, GPS, NFC आणि एक IR ब्लास्टर मिळतो. तर सिक्योरिटीसाठी यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. तसेच यात डॉल्बी अ‍ॅटमॉस असलेले स्टिरिओ स्पीकर आणि 3.5mm ऑडिओ जॅक देखील आहे. हे देखील वाचा: लो बजेटमध्ये लाॅन्च झाला Vivo Y02A; स्टाईलिश लुकसह मिळेल 5,000mAh Battery

रेडमी नोट 12 प्रोची किंमत आणि उपलब्धता

रेडमी नोट 12 प्रोची इंडोनेशियात घोषणा करण्यात आली आहे परंतु कंपनीनं या फोनच्या किंमत किंवा उपलब्धतेची माहिती दिली नाही. उपरोक्त पोस्टरमधून हा फोन मे मध्ये उपलब्ध होईल हे स्पष्ट झालं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here