
Realme सध्या आपल्या नवीन Realme GT Neo 6 सीरीजवर काम करत आहे. ज्यात Realme GT Neo 6 आणि GT Neo 6 Pro सारखे दोन डिवाइस लाँच होऊ शकतात. कंपनीनं कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही, परंतु लवकरच हे डिवाइस सादर केले जाऊ शकतात. आता दोन्ही मॉडेल सर्टिफिकेशन साइट TENAA वर लिस्ट झाले आहेत. ह्या लिस्टिंगमध्ये स्मार्टफोनची इमेज दिसत आहे.
Realme GT Neo 6 सीरीज TENAA लिस्टिंग
- TENAA सर्टफिकेशन लिस्टिंग नुसार Realme GT Neo 6 चा मॉडेल नंबर RMX3823 आणि Neo 6 Pro चा RMX3820 आहे.
- TENAA लिस्टिंगमध्ये फोन्सचे फोटो देखील समोर आले आहेत.
- इमेज मध्ये स्मार्टफोनचा मोठा कॅमेरा मॉड्यूल दिसत आहे. ज्यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल.
- फोनच्या उजवीकडे पावर बटन आणि वॉल्यूम अप डाउन बटन आहे.
- तुम्ही पाहू शकता की डिवाइस ग्रे आणि वाइट कलरमध्ये समोर आला आहे.
Realme GT Neo 6 Pro स्पेसिफिकेशन्स (लीक)
- डिस्प्ले : लीकनुसार प्रो व्हेरिएंट मध्ये 6.74 इंचाचा 1.5 के रिजॉल्यूशन असलेला अॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. ह्या डिस्प्लेवर 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट दिला जाऊ शकतो.
- प्रोसेसर : फोनचा प्रोसेसर पाहता स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रेगन 8 जेन 2 चिपसेट मिळू शकतो.
- स्टोरेज : स्टोरेजच्या बाबतीत डिवाइस 24जीबी पर्यंत रॅम + 1TB पर्यंत इंटरनल स्टोरेजसह येण्याची शक्यता आहे.
- बॅटरी : बॅटरी पाहता स्मार्टफोनमध्ये 4600एमएएचची बॅटरी, 240 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह दिली जाऊ शकते. कंपनी फोनचा 150 वॉट फास्ट चार्जिंग मॉडेल देखील आणू शकते.
- कॅमेरा : कॅमेरा फीचर्स पाहता लिस्टिंग इमेजमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिसला आहे. ह्यात युजर्सना 50 मेगापिक्सलची सोनी IMX 890 प्रायमरी कॅमेरा लेन्स ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनसह दिली जाऊ शकते.
- ओएस : ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर चालू शकतो.
Realme GT Neo 6 स्पेसिफिकेशन्स (लीक)
- डिस्प्ले : GT Neo 6 मध्ये देखील 6.74 इंचाचा 1.5K रिजॉल्यूशन असलेला अॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. ह्या डिस्प्लेवर 144hz रिफ्रेश रेट मिळेल.
- प्रोसेसर : हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी 9200 प्लस चिपसेटसह येऊ शकतो.
- बॅटरी : फोनमध्ये युजर्सना 5000mAh ची बॅटरी 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळू शकते.
- स्टोरेज : स्टोरेजच्या बाबतीत हा डिवाइस 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेजसह येऊ शकतो.
- कॅमेरा : ह्या फोनमध्ये देखील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. कॅमेरा लेन्सची माहिती मात्र मिळाली नाही.
- ओएस : हा डिवाइस लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर चालू शकतो.














