Realme Narzo 20 सीरीज आज भारतात अधिकृतपणे लॉन्च केला गेला आहे. या सीरीज मध्ये तीन स्मार्टफोन-Realme Narzo 20, Realme Narzo 20 Pro आणि Realme Narzo 20A चा समावेश आहे. रियलमी नार्जो 20 सीरीजच्या स्मार्टफोन्स संदर्भात अनेक दिवसांपासून लीक समोर येत होते. रियलमी नार्जो 20 सीरीज कंपनीने याआधी सादर केलेल्या रियलमी नार्जो 10 सीरीजचा अपग्रेड आहे. Realme Narzo मध्ये कंपनीने दोनच फोन सादर केले होते. पुढे आम्ही Realme Narzo 20 Pro बाबत माहिती देणार आहोत.
Realme Narzo 20 Pro ची डिजाइन
रियलमी नार्जो 20 प्रो मध्ये फ्रंटला वरच्या बाजूला डावीकडे होल-पंच डिस्प्ले देण्यात आला आहे. या पंच-होल मध्ये फ्रंट कॅमेरा आहे. होल-पंच मुळे फोनच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत. तर बॉटमला थोडा चिन पार्ट दिसत आहे . स्मार्टफोन मध्ये साइड-फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या मागे वर्टिकल शेप क्वाड कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या बॉटमला 3.5एमएम जॅक, टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि स्पीकर ग्रिल आहेत. लुकच्या बाबतीत हा रियलमी जुन्या फोन्स सारखा आहे. फोनचे डाइमेंशन पाहता याची उंची 160.3 मिमी, रुंदी : 70.4 मिमी, जाडी : 8.4 मिमी आणि वजन: 198 ग्राम आहे.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
रियलमी नार्जो 20 प्रो मध्ये 6.5 इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात 90.5 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो आहे. तसेच फ्रंटला डिस्प्ले वर प्रोटेक्शनसाठी कोर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन देण्यात आली आहे. तसेच हँडसेट मध्ये 90Hz अल्ट्रा स्मूद डिस्प्ले देण्यात आला आहे जो जुन्या 60Hz पेक्षा 50 टक्के जास्त हाई रिफ्रेश रेट सह येतो.
Realme Narzo 20 Pro मध्ये एकूण पाच कॅमेरे देण्यात आले आहेत, त्यातले चार मागे आणि एक फ्रंटला सेल्फीसाठी आहेत. मागे असलेल्या क्वाड कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे तर यात अपर्चर f/1.8, 6P लेंस 1/2 सेंसर साइज असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, अपर्चर f/2.3 सह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड-अँगल लेंस, अपर्चर f/2.4 सह 5P लेंस असलेला 2 मेगापिक्सल B&W पोर्टेट कॅमेरा आणि अपर्चर f/2.4, असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो 3P लेंस आहे. तसेच फ्रंटला सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी अपर्चर f/2.1 सह 16 मेगापिक्सलचा Sony IMX471 सेंसर आहे.
रियलमी नार्जो 20 प्रो मध्ये मीडियाटेक हीलियो G95 गेमिंग प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर 12nm प्रोसेसचा वापर करून बनवण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी यात 900MHz Mali-G76GPU देण्यात आला आहे. या प्रोसेसरचा वापर कंपनीने रियलमी 7 मध्ये आधीपण केला आहे. तसेच Narzo 20 Pro मध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे.
पावर बॅकअपसाठी नार्जो 20 मध्ये 65W सुपरडार्ट चार्ज सह 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच फोन मध्ये 10V / 6.5A चार्जर आणि केबल मिळते. फोन मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट चार्जिंगसाठी देण्यात आला आहे. फोन मधील 65 वॉट सुपर डार्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी बद्दल बोलायचे तर याबाबत कंपनीने दावा केला आहे कि या टेक्नॉलॉजीने फोन फक्त 3 मिनिटांत 33 टक्क्यांपर्यंत चार्ज केला जाऊ शकतो. तसेच 100 टक्के चार्जसाठी फक्त 34 मिनिटे लागतील.
रियली नारजो 20 प्रो अँड्रॉइड10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो जो कंपनीच्या रियलमी यूआई वर आधारित आहे. फोन मध्ये कनेक्टिविटीसाठी 2.4/5 GHz, 802.11 a/b/g/n/ac, ब्लूटूथ 5.0 आणि नेविगेशनसाठी GPS / AGPS/ Glonass आहे. तसेच फोन मध्ये 3-कार्ड स्लॉट देण्यात आले आहेत, त्यातले 2 सिम स्लॉट आणि एक माइक्रोएसडी कार्ड स्लॉट आहे.
किंमत आणि उपलब्धता
किंमतीबद्दल बोलायचे तर कंपनीने रियलमी नार्जो 20 प्रो दोन रॅम व स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला आहे. डिवाइसच्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे आणि 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. डिवाइसची पहिली विक्री 25 सप्टेंबर पासून दुपारी 12 वाजता रियलमी.कॉम आणि ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वर होईल. तसेच फोन ऑफलाईन पण विकला जाईल. डिवाइस White Knight आणि Black Ninja कलर ऑप्शन मध्ये येतो.

















