12GB रॅम, 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी असलेल्या 5G फोनवर मिळत आहे 2500 रुपयांची सूट

रिअलमीने एप्रिलमध्ये आपला P1 Pro 5G हा भारतीय बाजारात लाँच केला होता. त्यावर सध्या कंपनीकडून सवलत आणि बँक ऑफरसह एक्सचेंज सारखे फायदे देखील दिले जात आहेत. एकंदरीत हा मोबाईल तुम्हाला लाँच किमतीपेक्षा खूपच कमी किमतीत मिळेल. चला, पुढे सर्व ऑफर, नवीन किंमत आणि स्पेसिफिकेशन यांना तपशीलवार जाणून घेऊया.

Realme P1 Pro 5G ऑफर तपशील

  • Realme P1 Pro 5G वर सध्या 2,500 रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. त्यानंतर त्याचे बेस मॉडेल 8 जीबी + 128 जीबी हा 19,499 रुपयांना झाला आहे.
  • मिड मॉडेल 8 जीबी + 256 जीबी पर्यायाची किंमत 20,499 रुपये आणि टॉप व्हेरिएंट 12 जीबी + 256 जीबी ची किंमत 20,999 रुपये आहे.
  • फोनच्या बेस आणि मिड मॉडेल्सवर 2,000 रुपयांची बँक ऑफर आणि टॉप मॉडेलवर 1,500 रुपयांचा फायदा मिळेल.
  • जर तुम्ही फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डचा वापर केला तर तुम्हाला 5 टक्क्यांपर्यंतचा कॅशबॅक देखील मिळेल.
  • एक्सचेंज ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीनुसार तुम्हाला 14,800 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
  • रंगाच्या पर्यायांबद्दल बोलायचे झाल्यास Realme P1 Pro 5G फिनिक्स रेड आणि पॅरोट ब्लू मध्ये येतो.

8 जीबी+128 जीबी लाँच किंमत: 21,999 रुपये
ऑफर किंमत: 19,499 रुपये

8 जीबी + 256 जीबी लाँच किंमत: 22,999 रुपये
ऑफर किंमत: 20,499 रुपये

12 जीबी + 256 जीबी लाँच किंमत: 23,499 रुपये
ऑफर किंमत: 20,999 रुपये

कोठून खरेदी करायची

तुम्ही हा फोन ऑनलाईन शॉपिंग साईट फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. कारण येथे सर्वोत्तम डिल्स उपलब्ध आहेत. तर कंपनीच्या वेबसाईटवर ग्राहकांना बेस आणि मिड मॉडेल्स समान किंमतीत मिळतील, परंतु टॉप मॉडेलची किंमत जास्त आहे.
फ्लिपकार्ट लिंक

काय तुम्ही Realme P1 Pro 5G खरेदी केला पाहिजे

मोबाईलचा लूक आणि परफॉर्मन्स लक्षात घेऊन तो स्वस्त दरात खरेदी करणे हा वाईट पर्याय ठरणार नाही. यामध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 चिपसेट, 50 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, 45 वॉट फास्ट चार्जिंग सारखे फिचर्स मिळतील. तुम्हाला सांगतो की याच महिन्यात ब्रँड या सीरीजचे अपग्रेड P2 Pro 5G देखील आणत आहे. म्हणून जर तुम्हाला फोन घेण्याची घाई नसेल तर तुम्ही प्रतीक्षा करू शकता.

Realme P1 Pro 5G चे स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले: Realme P1 Pro 5G मध्ये 6.7 इंचाचा एफएचडी+ कर्व्ह व्हिजन ओएलईडी डिस्प्ले दिला गेला आहे. त्यावर 2412 x 1080 चे पिक्सेल रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 950 निट्स पीक ब्राईटनेस मिळत आहे.
  • प्रोसेसर: Realme P1 Pro 5G मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 5G चिपसेट लावला आहे. हा 2.2Ghz पर्यंतची सर्वात जास्त क्लॉक स्पीड देतो. डिव्हाईसमध्ये 3D VC कुलिंग सिस्टम देखील आहे.
  • स्टोरेज: फोनमध्ये 12 जीबी रॅम + 256 जीबी इंटरनल स्टोरेजचा पर्याय आहे. तर डायनॅमिक रॅमची सुविधा आहे. ज्याद्वारे इंटरनल स्टोरेजमधून रॅम वाढवता येऊ शकते.
  • कॅमेरा: Realme P1 Pro 5G मध्ये ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशन सपोर्ट असलेला 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा पोर्ट्रेट कॅमेरा आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
  • बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 45 वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळत आहे.
  • इतर: डिव्हाईस मध्ये 2.4 ते 5GHz वाय-फाय, ब्लूटूथ 5.2, रेनवॉटर टच फिचर, IP65 रेटिंग, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, हाय रेस ड्युअल स्पीकर, 9 5G बँड्स चा सपोर्ट दिला गेला आहे.
  • ओएस: स्मार्टफोन अँड्रॉईड 14 आधारित रिअलमी यूआय 5.0 वर रन करतो. यामध्ये तुम्हाला 3 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स आणि 2 वर्षांचे ओएस अपडेट देखील मिळतील.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here