वनप्लस ने सॅमसंग-अॅप्पल ला टाकले मागे, बनला भारतातील सर्वात मोठा प्रीमियम ब्रँड : रिपोर्ट

फ्लॅगशिप कीलर म्हणून प्रसिद्ध असलेल्या वनप्लस ने मे महिन्यात भारतात आपला नवीन हाईएंड डिवाईस वनप्लस 6 लॉन्च केला होता. दमदार स्पेसिफिकेशन्स असलेला हा स्मार्टफोन देशात भरपूर लोकांना आवडला आहे. तसेच आता इंडियन स्मार्टफोन बाजारातून एक अशी बातमी समोर आली आहे जी वनप्लस फॅन्स साठी खुप खास आहे. रिसर्च फर्म काउंटरप्वाइंट ने एक नवीन रिपोर्ट शेयर केला ही ज्यात सांगितले आहे की स्मार्टफोन प्रीमियम सेग्मेंट मध्ये वनप्लस सॅमसंग व अॅप्पल ला मागे टाकत देशातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे.

काउंटर प्वाइंट ने आपल्या रिपोर्ट मध्ये साल 2018 च्या दुसर्‍या तिमाहीचे आकडे शेयर केले आहेत. या आकडेवारीवरून समजले आहे की वनप्लस ने एप्रिल, मे आणि जून महिन्यात प्रीमियम सेग्मेंट मध्ये रेकॉर्ड सेल केला आहे आणि त्यामुळे कंपनी सॅमसंग आणि अॅप्पल ला मागे टाकत भारतातील सर्वात मोठा प्रीमियम सेग्मेंट वाला ब्रँड बनली आहे. स्पष्ट आहे की वनप्लस कंपनी ला हे यश कंपनी च्या नवीन स्मार्टफोन वनप्लस 6 मुळे मिळेल आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच वनप्लस ने प्रीमियम सेग्मेंट वर राज्य करणार्‍या सॅमसंग ला मागे टाकेल आहे.

भारतात 30,000 रुपयांपेक्षा जास्त बजेट ला प्रीमियम सेग्मेंट मध्ये ठेवण्यात येते. या वर्षीच्या दुसर्‍या तिमाहीत याच सेग्मेंट मध्ये वनप्लस ने 40 टक्के मार्केट शेयर्स वर कब्जा करत देशात पाहिले स्थान मिळवले आहे. वनप्लस 6 हिट झाल्यामुळे वनप्लस इथवर आली आहे. या सेग्मेंट मध्ये वनप्लस च्या मागे असलेल्या सॅमसंग कडे 34 टक्के शेयर आहे. तर प्रीमियम सेग्मेंट मध्ये 14 टक्के मार्केट शेयर्स सह अॅप्पल तिसर्‍या नंबर वर आहे.

वनप्लस साठी भारतीय स्मार्टफोन बाजार खुप खास आहे. ​रिपोर्ट नुसार सध्या भारतातून वनप्लस ला एक तृतीयांश फायदा होत आहे. वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीच्या प्रीमियम सेग्मेंट च्या रिपोर्ट नुसार या 40 टक्के शेयर मध्ये वनप्लस च्या वनप्लस 6 च्या सेल चा समावेश आहे तर सॅमसंग कडून गॅलेक्सी एस9 सीरीज तसेच अॅप्पल चे आयफोन 8 व आयफोन 10 आहेत.

विशेष म्हणजे गेल्या वर्षी पेक्षा सॅमसंग ने या वर्षी गॅलेक्सी एस9 ची शिपमेंट कमी केली होती. दुसरीकडे आयफोन ची जास्त किंमत अॅप्पल च्या या पिछाडी चे मुख्य कारण असू शकते. वनप्लस, सॅमसंग आणि अॅप्पल ने मिळून भारतातील प्रीमियम स्मार्टफोन मार्केट च्या 88 टक्के भागावर कब्जा केला आहे. पण वर्षाच्या सुरवातीला या तिन्ही कंपन्या देशातील 95 टक्के प्रीमियम बाजारावर राज्य करत होत्या.

हुआवई पी20, वीवो एक्स21, नोकिया 8 सिरोको आणि एलजी वी30 प्लस सारख्या स्मार्टफोन्स मुळे सॅमसंग, वनप्लस व अॅप्पल ला प्रीमियम सेग्मेंट मध्ये 6 टक्क्यांचे नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here