
वोडाफोन आयडियानं आपल्या ग्राहकांना खुश करत गुपचूप दोन रिचार्ज प्लॅनमध्ये आधीपेक्षा जास्त बेनिफिट्स देण्यास सुरुवात केली आहे. Vodafone Idea (Vi) नं Rs 195 आणि Rs 319 प्रीपेड प्लॅन रिवाइज केले आहेत. टेलीकॉम कंपनी या स्वस्त प्लॅन्समध्ये आता जास्त फायदे देत आहे. जास्त वेळ न दवडता जाणून घेऊया या प्लॅनमधील नवीन बेनिफिट्सची माहिती.
Vodafone Idea च्या 195 रुपयांच्या प्लॅनमधील फायदे
सर्वप्रथम वोडाफोन आयडियाच्या 195 रुपयांचा प्लॅनबद्दल बोलायचं तर यात आता आधीपेक्षा जास्त फायदे मिळतील. आधी या पॅकमध्ये युजर्सना 2GB डेटा मिळत होता. परंतु आता या प्लॅनमध्ये 3GB डेटा दिला जात आहे. तसेच या रिचार्जमध्ये आधीप्रमाणे 300SMS आणि अनलिमिटिड कॉलिंग देखील मिळेल. त्याचबरोबर यात 1 महिन्याची वैधता देखील कायम ठेवण्यात आली आहे ज्यात कोणताही बदल करण्यात आला नाही. तसेच प्लॅनमध्ये आता कंपनी Vi Movies & TV चे बेनिफिट मिळतील जे कोणत्याही अतिरिक्त शुल्काविना दिले जात आहेत. हे देखील वाचा: Redmi 12C आणि Redmi Note 12 4G होऊ शकतात भारतात दाखल; लीकमधून समजली माहिती
Vodafone Idea च्या 319 रुपयांचा प्लॅनमधील फायदे
वोडाफोन आयडियाचा 319 रुपयांचा प्लॅन पाहता यात आता 2GB डेटा मिळतो. तसेच, डेली 100SMS वापरण्यासाठी दिले जात आहेत. प्लॅनमध्ये हीरो अनलिमिटिड बेनिफिट्सचा लाभ देखील दिला जात आहे, ज्याच्या मदतीनं बिंज ऑल नाइट, रोल ओव्हर डेटा, आणि Vi Movies & TV चा फायदा देखील युजरला मिळतो. हे सर्व लाभ प्लॅनमध्ये आधी देखील मिळत होते. परंतु कंपनीनं याची वैधता वाढवली आहे. आधी हा प्लॅन 1 महिन्याच्या वैधतेसह येत होता, आता यात तुम्हाला 31 दिवसांची व्हॅलिडिटी मिळत आहे. हे देखील वाचा: Nothing Phone (2) मध्ये मिळणार Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट; क्वॉलकॉमच्या अधिकाऱ्यांनी चुकून दिली माहिती
296 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
टेलीकॉम कंपनी वोडाफोन आयडियानं अलीकडेच 296 रुपयांचा रिचार्ज प्लॅन सादर केला होता. या नवीन प्रीपेड पॅकसह तुम्हाला एकूण 25जीबी सुपरफास्ट इंटरनेट डेटा आणि पूरे 30 दिवसांची वैधता मिळेल. इतकेच नव्हे तर युजर्सना Vi Movies & TV Classic चा अॅक्सेस देखील दिला जाईल, ज्यात चित्रपट आणि टीव्ही शोचा अनलिमिटिड अॅक्सेस देण्यात आला आहे.














