Xiaomi 13 Pro च्या भारतीय किंमतीचा खुलासा; कंपनीनं दिली माहिती

Highlights

  • Xiaomi 13 Pro भारतीय बाजारात लाँच झाला आहे.
  • या फोनची विक्री 10 मार्चपासून अ‍ॅमेझॉन इंडियावर सुरु होईल.
  • यात सर्वात शक्तिशाली प्रोसेसर Qualcomm Snapdragon 8 Gen 2 देण्यात आला आहे.

शाओमीनं आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi 13 Pro भारतीय बाजारात आला आहे. MWC 2023 च्या मंचावरून हा फोन ग्लोबली लाँच केल्यानंतर आज कंपनीनं याच्या भारतीय किंमतीचा आणि सेल डेटची घोषणा केली आहे. सर्वात शक्तिशाली प्रोसेसर Qualcomm Snapdragon 8 Gen 2 वर चालणारा हा शाओमी 13 प्रो भारतात किती रुपयांमध्ये विकला जाईल आणि यावर कोणत्या ऑफर्स मिळतील, ही माहिती पुढे देण्यात आली आहे.

Xiaomi 13 Pro ची किंमत

शाओमी 12 प्रो भारतात सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. हा मोबाइल फोन 12 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 79,999 रुपये आहे. Xiaomi 13 Pro ची विक्री 10 मार्च पासून सुरु होईल तसेच हा मोबाइल फोन Ceramic White आणि Ceramic Black कलरमध्ये अ‍ॅमेझॉन व मी स्टोर्सवरून विकत घेता येईल. आयसीआयसीआय बँक कार्डवर कंपनी थेट 10,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. या बँकेच्या ग्राहकांना हा फोन 69,999 रुपयांमध्ये मिळेल. या फोनचा पहिला सेल 6 मार्चला होईल. हे देखील वाचा: Realme C55 भारतात कधी होणार लाँच आणि कसा असेल लुक व स्पेसिफिकेशन्स; इथे पाहा सर्व माहिती

Xiaomi 13 Pro Specification

  • 6.73″ QHD+ 120Hz Display
  • 12GB RAM + 512GB Storage
  • Qualcomm Snapdragon 8 Gen2
  • 32MP Selfie Sensor
  • 50MP+50MP+50MP Rear Camera
  • 120W Fast Charging
  • 50W Wireless Charging

फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सेटअपमध्ये तीन 50 मेगापिक्सलचे कॅमेरा सेन्सर्स आहेत ज्या लाइका लेन्स आहेत. बॅक पॅनलवर एफ/1.9 अपर्चर असलेला 50MP Sony IMX989 सेन्सर, एफ/2.2 अपर्चर असलेली 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.0 अपर्चर असलेली 50 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी शाओमी 13 प्रो एफ/2.0 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

शाओमी 13 प्रो अँड्रॉइड 13 आधारित मीयुआय 14 वर लाँच झाला आहे. हा पहिला शाओमी स्मार्टफोन आहे जो भारतात या युजर इंटरफेससह लाँच झाला आहे. प्रोसेसिंगसाठी यात 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनेलला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 740 जीपीयूला सपोर्ट करतो. हेव्ही युज आणि गेमिंगसाठी यात अल्ट्रा लार्ज लिक्विड कूल व्हीसी टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. हा शाओमी फोन LPPDDR5x RAM आणि UFS 4.0 storage टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.

या फोनमध्ये 3200 x 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.73 इंचाचा क्वॉडएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन ई6 अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. कंपनीनं हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसनं प्रोटेक्टेड आहे. डिस्प्लेसह 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 1900निट्स ब्राइटनेस आणि 1920हर्ट्ज पीडब्ल्यूएम डिमिंग सारखे फीचर्स देखील मिळतात. हे देखील वाचा: महागडे फीचर्स परवडणाऱ्या किंमतीत! OnePlus Ace 2V सह कंपनी पुन्हा ठरणार का ‘फ्लॅगशिप कीलर’

शाओमीनं आपला हा नवीन स्मार्टफोन 4,820एमएएचच्या बॅटरीसह बाजारात आणला आहे. बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी शाओमी 13 प्रोमध्ये 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. तसेच यूएसबीविना फोन चार्ज करण्यासाठी यात 50वॉट वायरलेस चार्जिंग आणि 10वॉट रिवर्स वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here