Realme Q2 इंडियन वेबसाइटवर लिस्ट, लवकरच होईल लॉन्च

Realme ने ऑक्टोबर मध्ये आपली ‘क्यू सीरीज’ सादर केली होती. कंपनीने आपल्या होम मार्केट म्हणजे चीन मध्ये तीन नवीन फोन लॉन्च केले होते जे Realme Q2, Realme Q2 Pro आणि Realme Q2i नावाने बाजारात आले होते. शानदार स्पेसिफिकेशन्स आणि कमी किंमत असलेले हे स्मार्टफोन आता लवकरच भारतीय बाजारात पण एंट्री घेऊ शकतात. बातमी मिळाली आहे कि सीरीजचा एक स्मार्टफोन रियलमी क्यू2 भारतीय सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार Realme Q2 स्मार्टफोन इंडियन सर्टिफिकेशन्स साइट बीआयएस वर लिस्ट केले गेले आहेत. या सर्टिफिकेशनची माहिती टिपस्टर मुकुलशर्माच्या माध्यमातून समोर आली आहे. बीआयएस वर हा नवीन रियलमी फोन RMX2117 मॉडेल नंबर सह सर्टिफाइड झाला आहे ज्याबाबत बोलले जात आहे कि हा चीन मध्ये लॉन्च झालेल्या रियलमी क्यू2 स्मार्टफोनचा इंडियन वर्जन असेल. हा फोन भारतात Realme Q2 नावाने लॉन्च होईल किंवा दुसऱ्या एखाद्या नावाने हे अजून स्पष्ट झाले नाही.

Realme Q2

रियलमीने या सीरीजचा रियलमी क्यू2 स्मार्टफोन 6.5-इंचाच्या एफएचडी+ एलसीडी डिस्प्ले वर लॉन्च केला आहे जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेट सह येतो. Realme Q2 Pro मध्ये 6.43-इंचाचा एफएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, त्यासोबत 180Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 600 निट्स पीक ब्राइटनेस आहे. हा स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह येतो.

हे देखील वाचा : रियलमीचा 5G फोन Realme X7 Pro येत आहे भारतात, कंपनीच्या वेबसाइट वर झाला लिस्ट

रियलमीचे हे दोन्ही फोन अँड्रॉइड 10 वर लॉन्च झाले आहेत ज्यात प्रोसेसिंगसाठी मीडियाटेकचा डायमनसिटी 800यू चिपसेट देण्यात आला आहे. Realme Q2 6जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर Realme Q2 Pro स्मार्टफोन चीन मध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे. पावर बॅकअपसाठी रियलमी क्यू2 मध्ये 30वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे तर प्रो वर्जन 65वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेल्या 4,300एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Realme Q2i

Realme Q2 मध्ये मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये f/1.8 अपर्चर सह 48-मेगापिक्सल प्राइमरी लेंस, 8-मेगापिक्सल वाइड अँगल लेंस 119-डिग्री FoV आणि 2-मेगापिक्सल मॅक्रो लेंस आहे. तसेच फोनच्या फ्रंटला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. दुसरीकडे Realme Q2 Pro मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये 48MP ची प्राइमरी लेंस, 8MP वाइड-अँगल लेंस 119-डिग्री FoV, 2MP B&W पोर्टेट लेंस आणि 2MP 4cm मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फीसाठी यात पण 16MP चा लेंस देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here