60X झूम असलेला Realme X3 SuperZoom झाला लॉन्च, करेल का Xiaomi ची सुट्टी

Realme X3 SuperZoom अधिकृतपणे आज यूरोप मध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनसाठी कंपनीने आज एक इवेंटचे आयोजन केले होते. रियलमीच्या एक्स सीरीज मध्ये सादर झालेला हा स्मार्टफोन Realme X2 Pro चा अपग्रेडेड वर्जन म्हणून सादर केला गेला आहे. काही दिवसांपूर्वी 91मोबाईल्सने एक्सक्लूसिवली माहिती दिली होती कि कंपनी Realme X3 SuperZoom सह Realme X3 जूनच्या मध्यात भारतात सादर करणार आहे. चला जाणून घेऊया लॉन्च झालेल्या नवीन फोन रियलमी एक्स3 सूपरझूम ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.

Realme X3 SuperZoom किंमत आणि उपलब्धता

Realme X3 SuperZoom कंपनीने यूरोपियन मार्केट मध्ये EUR 499 (जवळपास 41,000 रुपये) मध्ये लॉन्च केला आहे. डिवाइस सिंगल 12GB + 256GB वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. तसेच डिवाइस Glacier Blue आणि Arctic White कलर ऑप्शन मध्ये आला आहे. हँडसेट आज पासून प्री-ऑर्डरसाठी आला आहे आणि 2 जून पासून विक्रीस येईल. अधिकृतपणे या फोनच्या इंडिया लॉन्च डेट बद्दल कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही.

Realme X3 SuperZoom चे स्पेसिफिकेशन्स

Realme X3 SuperZoom मध्ये 6.6-इंचाचा फुल एचडी+ एलसीडी डिस्प्ले पंच-होल कटआउट सह देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 2.5D गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन आणि 480 निट्स ब्राइटनेस आहे. फोन मध्ये 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले आहे. त्याचबरोबर फोन मध्ये गेल्या वर्षीचा फ्लॅगशिप प्रोसेसर 2.9GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855+ SoC आहे. Realme नुसार X3 SuperZoom स्नॅपड्रॅगॉन 855+ सह येणारा सर्वात पावरफुल फोन आहे जो सध्या मार्केट मध्ये आहे. स्मार्टफोन लिक्विड कूलिंग सह सादर केला गेला आहे जो गेमिंग करताना तुमचा फोन गरम होऊ देत नाही.

कॅमेरा सेगमेंट पाहता Realme X3 SuperZoom मध्ये क्वाड कॅमेरा सपोर्ट देण्यात आला आहे, ज्यात पेरिस्कोप लेंस 5x ऑप्टिकल झूम आणि 60x डिजिटल झूमला सपोर्ट करते. कॅमेरा सेटअप पाहता यात 64MP मेन सेंसर, 8MP वाइड-अँगल लेंस, 8MP पेरिस्कोप लेंस आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. तसेच डिवाइसचा मेन कॅमेरा नवीन Starry मोड फीचर सह येतो. तसेच फ्रंट वर 32MP मेन कॅमेरा व 8MP वाइड-अँगल लेंस देण्यात आला आहे. हँडसेट एंडरॉयड 10-बेस्ड रियलमी यूआई वर चालतो. तसेच फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4,200mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here